Posts

Showing posts from July, 2019

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

Image
लोणी (प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगील युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली व विजयाची निशाणी म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो.               या वेळी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कृषी शिक्षण संचालक डॉ.मधूकर खेतमाळस यांनी कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या शौर्य, वीरता, पराक्रम आणि बलिदानाचे प्रतिक आहे, कारगिलमध्ये सुमारे दोन महिने चाललेल्या या युद्धात भारतीय सैन्याने कारगीलची शिखरं ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना हकलून लावले होते व खरे पाहता हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतोय याचा अभिमान वाटतोय असे मत व्यक्त केले.तसेच स्वयंसेवक संचिता गवारे हीने आपल्या मनोगतातून त्यावेळी झालेल्या युद्धप्रसंगाचे रोमांचकारक वर्णन उपस्थितांसमोर मांडले.            यावेळी संस्थेचे कृषी शिक्...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात महापुरुषांना अभिवादन

Image
लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी लोणी (प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.               यावेळी तृतीय वर्षातील विद्यार्थी व रा.से.यो.स्वयंसेवक  विक्रमसिंह पासले याने दोन्ही महापुरुषांचे देशप्रेम, दुरदृष्टी व त्याग आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांसमोर मांडला.तर केसरी व मराठा वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती व शिवजयंती व गणेश उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांना एकोपा निर्माण करण्याचे काम केले तर चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी प्राण पणाला लावले असे प्रतिपादन स्वयंसेवक सचिन वाघ याने केले.               यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे, रा.सो.यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,प्र...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉक कार्यक्रमात स्टुडन्ट पार्टनर द्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

Image
 शिकत असतानाच अनुभव व पैसे कमवण्याची विद्यार्थ्यांना संधी- इंटरशालाचा उपक्रम प्रवरानगर दि. २२ जुलै, २०१९ : महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आधारावर योग्य ठिकाणी काम उपलब्ध करून देताना विशिष्ठ मोबदल्या बरोबरच अनुभव प्राप्त केलेल्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी "इंटर्नशीप टॉक" द्वारे जुनिअर विद्यार्थ्यांना  इंटर्नशालाची  इंटर्नशीप करण्याबाबत प्रोत्साहित केले.            लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये  विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी  नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून  महाविद्यालयात इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय आहेर या...

स्पर्धा परीक्षा पास होणे हे एक तंत्र - डॉ. वाय. एस. पी. थोरात

Image
लोणी (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षांसाठी घोकंपट्टी करण्यापेक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे अभ्यासाचे तंत्र विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांना यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन, ग्रुप स्टडी, अवांतर वाचन व व्यक्तिमत्व विकास ह्या बाबींचा विद्यार्थ्यांनी अंतर्भाव करायला हवा असा मूलमंत्र नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांनी दिला.                     लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रवरा ऍकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह सक्सेस (पॅक्स) च्या एमपीएससी व यूपीएससीच्या कृषी व कृषी संलग्नित व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रशासकीय सेवेतील निवडीचे व  कामकाजाचे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडताना परीक्षा पास झाल्यानंतरच्या मुलाखतीसाठी सामोरे जाताना समयसूचकता व हजरजबाबीपणा महत्वाचा असतो. मुलाखत घेणाऱ्या पेक्षा मुलाखत देणाऱ्याच्य...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची आय.सी .आय.सी .आय बँकेमध्ये सिनियर ऑफिसर या पदासाठी निवड

Image
                               कु.पूजा थोरात                             कु.ऋतुजा बहिरट                                   योगेश धोंडगे   कु.अमृता आढाव      मनीष गोलाईटकर प्रवरानगर दि. १० जुलै, २०१९ : लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या अंतर्गत आय.सी .आय.सी .आय बँकेचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच  विद्यार्थ्यांची सिनियर ऑफिसर या पदावर नोकरी साठी निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.             यामध्ये कु.अमृता आढाव,कु.ऋतुजा बहिरट,कु.  पूजा थोरात,मनीष गोलाईटकर ,योगेश धोंडगे यांची आय.सी.आय.सी.आय ब...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय 'मायक्रोअरे तंत्रज्ञान कार्यशाळे'चे आयोजन

Image
विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घ्यावे - दत्तात्रय पाटील शिरसाठ प्रवरानगर दि ४,जुलै २०१९ : विज्ञान जैवतंत्रज्ञान विकासासाठी अभ्यासात आलेले नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसाद करून नवीन नवीन गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे असे प्रतिपादन नियोजन समितीचे संचालक श्री दत्ता पाटील शिरसाठ यांनी केले.      लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी व पद्मश्री विखे पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज प्रवरानगर यांच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या अध्यक्षतेखाली कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड...

नवीन पिढीचे शेती बाबतचे आकर्षण कमी - डॉ. बाबुराव उपाध्ये यांची खंत

Image
लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात  कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन प्रवरानगर दि.३ जुलै, २०१९ : सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक  आकर्षित होतात. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने भारताला शेतीप्रधान देश म्हटलं जाते,  परंतु राजकारण,समाजकारण आणि अध्यात्मामध्येही शेती  बद्द्ल  प्रेम व्यक्त केलं जात असले तरी, नवीन पिढीचे  शेती बाबतचे  आकर्षण कमी होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी  डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.          लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात  कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी  डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.  कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठाच्या रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी आणि कवी महाविरसिंग चव्हाण  प्रवरा परिसरातील शब्द्धश्नेही शब्दस्नेही चे  अध्यक्ष्य  कवी भास्कर दादा लगड, ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार प्राप्त  कवी यशवंत धोंडिबा पुलाटे, कवी पोपट...