कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉकचे आयोजन
शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी प्रवरानगर दि ३० सप्टेंबर २०१९ : लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी निर्माण करणाऱ्या इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली. इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते. ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्न...