कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉकचे आयोजन
शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी
प्रवरानगर दि ३० सप्टेंबर २०१९ :
लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी निर्माण करणाऱ्या इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.
इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते. ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर रघुनंदन चौधरी, सायली ढेरंगे, ऋचा खैरनार, ऋतुजा भालेराव यांनी अतिशय सुलभपणे समजावून सांगितले.
या विद्यार्थ्यांची इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १५ या कार्यक्रमासाठी निवड झाली होती. त्याचाच एक भाग म्हणून या इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले होते. इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर १५ या कार्यक्रमासाठी सचिन वाघ,स्नेहा हराळ,श्रद्धा शेळके,स्नेहल सहाने,जुई वाघ,मयुरी वालझडे व प्रीती ताकवणे अशा एकूण अकरा जणांची निवड झाली आहे.
या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषीकेश औताडे,प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत, प्रा.स्वप्निल नलगे, डॉ.विशाल केदारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रमसिंह पासले याने केले तर आभार आदित्य जोंधळे याने मानले.
Comments
Post a Comment