पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम समाज जीवनासाठी क्रांतिकारक - डॉ. बी. बी दास


लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) उपस्थित पायरेन्सचे संचालक डॉ. बी. बी दास, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर,  भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,विलास पासले,सुनिलकुमार चौधरी,सिध्दार्थ निकम आदी.(छाया दत्ता विखे)

प्रवरानगर दि २२ फेब्रुवारी २०२० : 
साठच्या दशकातील स्वात्रंत्र्याच्या उंबरठ्यावर पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम प्रवरा परिसरातील बेचाळीस गावाच्या  शेतकरी,शेतमजूर आणि समाजजीवनासाठी क्रांतिकारक ठरले. म्हणूनच, आज या परिसरातील सुमारे ७० तरुण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात काम करीत असल्याचे सांगताना. आज देशपातळीवर सेंद्रिय शेती उत्पादनाला महत्व दिले जात असल्याने शेती करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पायरेन्स संस्थेचे डायरेक्टर डॉ.बी.बी दास यांनी केले.
            लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) डॉ दास बोलत होते.या प्रसंगी कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, पालक आणि भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,विलास पासले, सुनिलकुमार चौधरी,सिध्दार्थ निकम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात  पालक व शिक्षकामध्ये सवांद व्हावा, विद्यार्थ्यांची प्रगती समजावी या उद्वेषाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती  पालकांना देण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा आणि प्रक्षेत्राला भेटी देऊन उपलब्ध सुविधांची माहिती जाणून घेतली. 
        डॉ. दास म्हणाले कि,प्रवरेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जागतिक स्पर्ध्येमध्ये सुलभ सहभाग घेता यावा या साठी प्रत्येक विद्यार्थ्याला  पुस्तकी ज्ञान देतानाच व्यवहारिक ज्ञानाची जोड आणि जागतिक पातळीवर जलद गतीने होणाऱ्या  बदलांची माहिती करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम नेहमीच राबविले जात असल्याचे सांगताना प्रवरेत शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असल्याचे ते म्हणाले.
      या वेळी काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी दिलीप बारी यांनी विद्यार्थी हे पालकांपासून दूर असून केवळ शिक्षकांवरच अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अडचणी समजावून घेऊन त्या सोडविल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सिद्धार्थ निकम यांनी परिस्थितीनेच माणूस घडत असल्याचे सांगून परिस्थिती मुळे शिक्षणापासून  वंचित राहू नये यासाठी प्रवरा शैक्षणिक संकुलात राबविण्यात येणाऱ्या कमवा आणि शिका योजनेचे कौतुक करताना.गरीब कुटुंबातील मुलं-मुली काम करून शिक्षण घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तर, प्रवरेत विद्यार्थी घडविण्याचे काम होत असल्याचे नंदकुमार चौधरी म्हणाले. पायरेन्स संस्थेच्या सेमिनार हॉल मध्ये झालेल्या  या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संखेने उपस्थित होते,शेवटी क्रीडा संचालक प्रा. सिताराम वरखड यांनी आभार व्यक्त केले. 

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड