Posts

परिसर स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छताही महत्त्वाची - डॉ.आनंद चवई

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन लोणी(प्रतिनिधी) : परिसर स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे व गाडगेबाबांनी याच मार्गाचा अवलंब करत दिवसभर परिसर स्वच्छता व संध्याकाळी किर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करण्याचे काम केले असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद चवई यांनी केले.                   प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात करण्यात आले या प्रसंगी डॉ.चवई बोलत होते.संत गाडगेबाबांनी सर्वस्वाचा त्याग करून समाजप्रबोधनाचे कार्य करत असतानाच अनेक रुढी,परंपरा व अंधश्रद्धा याचे निर्मूलनही केले असेही डॉ.चवई पुढे बोलताना म्हणाले.यावेळी स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने आपल्या प्रास्ताविकातून संत गाडगेबाबांच्या कार्याचा आलेख थोडक्यात उपस्थितांसमोर मांडला.             ...

प्रवरेच्या विद्यार्थ्यांची आदर्श गावांना अभ्यास सहल

Image
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचीही घेतली भेट परिवर्तन घडवायचे असेल तर शब्दाला कृतीची जोड द्या - अण्णा हजारे प्रतिनिधी (लोणी) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची आदर्श गावांना दोन दिवासीय अभ्यास सहल आयोजित केली होती.या सहलीमध्ये स्वयंसेवकांनी आदर्शग्राम राळेगणसिद्धी व हिवरेबाजार या प्रमुख गावांना भेटी देऊन तेथील विविध विकासकामांची पाहणी केली.या अभ्यास सहली दरम्यान स्वयंसेवकांनी निघोज येथील मळगंगा देवी व भौगोलिक रांजणखळगे तसेच वडगाव दर्या येथील दर्याबाई-वेल्हाबाई देवस्थान भौगोलिक लवणस्तंभ यांची निर्मिती व नैसर्गिक रचना याचाही अभ्यास केला.               या अभ्यास सहलीमध्ये स्वयंसेवकांनी निघोज व वडगाव दर्या येथे पर्यटकांमुळे निर्माण झालेला अस्वच्छ परिसर ही साफसफाई करून स्वच्छ केला.राळेगणसिद्धी व हिवरेबाजारच्या विकासाचे प्रारूप पाहून विद्यार्थी भारावून गेले.यावेळी स्वयंसेवकांनी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली.स...

कृषी व संल्गनित महाविद्यालये व सिंजेटा फौंडेशन यांच्या दरम्यान शैक्षणिक करार

Image
लोणी (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील सुशिक्षित तसेच अशिक्षित तरुणांना ग्रामीण भागातच कृषी व कृषी संलग्नित क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात तसेच शहरातील नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रशिक्षित विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय, लोणी व सिंजेटा फौंडेशन इंडिया यांच्या दरम्यान शैक्षणिक करार करण्यात आला असल्याची माहिती कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस यांनी दिली.         ग्रामीण भागातील अप्रशिक्षित मनुष्यबळाचे रुपांतर औद्योगिकदृष्ट्या लागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये करणे व त्त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन व आत्मविश्वास जागृत करण्याच्या हेतूने सिंजेटा फौंडेशन इंडिया ची स्थापना २००५ साली झाली. या कराराद्वारे सिंजेटा फौंडेशन इंडियाच्या “स्कील अपग्रेडेशन ऑफ रुरल युथ इन ऍग्रीकल्चर (सूर्या) ” प्रकल्पा अंतर्गत असलेला ४५ दिवसीय ३० विद्यार्थ्यासाठी “ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी असिस्टंट” कोर्से लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय येथे वर्षातून दो...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

Image
विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्व विकासावर भर देणे गरजेचे - डॉ.मगर लोणी(राहता) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने अग्निक्षेपणास्त्राचे जनक  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एस.मगर,कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.               यावेळी प्रथमतः डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्प अर्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी प्रास्ताविकातून डॉ.खेतमळस यांनी डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय थोडक्यात विद्यार्थ्यांसमोर मांडला तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यास करताना आपल्या व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर दिला पाहिजे असे मत डॉ.मगर यांनी मांडले.पुढे बोलताना ते म्हणाले की जसेजसे आपण मोठ्या पदावर जातो तसेतसे आपली प्रामाणिकता कमी होत जाते;याउलट आपण जर पदा...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुंचल्यांच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश

Image
परिसर स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी-डॉ.मधुकर खेतमाळस प्रवरानगर : प्रतिनिधी ; ०२ अॉक्टोबर,२०१८ : आपण महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे अनुकरण करायला हवे;ही प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे.सर्वांनी एकत्र येऊन प्लास्टिक चा वापर बंद केला पाहिजे.त्याचबरोबर आपला परिसर,गाव,शहर,देश स्वच्छ ठेवणे हा  प्रत्येकाचा अधिकार आहे आणि जेव्हा आपल्याला या अधिकाराची खर्या अर्थाने जाणीव होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने एक जबाबदार नागरिक बनू शकतो असे प्रतिपादन कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमळस यांनी व्यक्त केले.कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रम आयोजित केला होता यावेळेस डॉ.खेतमाळस बोलत होते.            यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात 'स्वच्छ भारत,सुंदर भारत'या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्या...

साक्षरता शिवारफेरीला जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांची भेट

Image
जीवनाला चिकित्सक व कृतीशील बनवायचे असल्यास साक्षरता महत्त्वाची - कृषीभुषण बन्सी पाटील तांबे लोणी (राहाता): जीवनाचे वेगवेगळे पैलू जाणून घेऊन जीवनाला चिकित्सक व कृतीशील बनवायचे असल्यास साक्षरता फार महत्त्वाची आहे असे मत प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे संचालक कृषीभुषण बन्सी पाटील तांबे यांनी व्यक्त केले. जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या जनजागृती रॕलीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.               यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालय ते निर्मलग्राम चंद्रापूर पर्यंत जनजागृती रॕलीचे आयोजन करून "गिरवू अक्षर होऊ साक्षर","साक्षरता दिवा घरोघरी लावा" अश्या घोषणा देऊन लोकांना जागरुत केले व नंतर स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी या रॕलीला अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी भेट देऊन पुढेही असेच समाजपयोगी उपक्रम राबण्यासाठी शुभेच्छा दिल्या.      यावेळी या कार्यक्रमासाठी राष्ट...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न लोणी:- प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परिचय सर्वांना व्हावा व नवीन विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाविषयी आत्मियता निर्माण व्हावी याच अनुषंगाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुलचे कमाडंट कर्नल डॉ.भरत कुमार,तर अध्यक्ष म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक के.पी नाना आहेर पाटील, प्राचार्य ऋषिकेश औताडे आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.               या वेळी बोलताना भरतकुमार यांनी जीवनात जर यश प्राप्त करायचे असेल तर आपले क्षेत्र आपणच निवडले पाहिजे आणि या क्षेत्रात असे काम केले पाहिजे की सर्वांनी आपले नाव काढले पाहिजे असे मत व्यक्त केले.तर भारत हा शेतीप्रधान देश आहे,भारतात सुमारे ७० % लोक शे...