साक्षरता शिवारफेरीला जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांची भेट


जीवनाला चिकित्सक व कृतीशील बनवायचे असल्यास साक्षरता महत्त्वाची - कृषीभुषण बन्सी पाटील तांबे

लोणी (राहाता): जीवनाचे वेगवेगळे पैलू जाणून घेऊन जीवनाला चिकित्सक व कृतीशील बनवायचे असल्यास साक्षरता फार महत्त्वाची आहे असे मत प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे संचालक कृषीभुषण बन्सी पाटील तांबे यांनी व्यक्त केले. जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या जनजागृती रॕलीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
              यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालय ते निर्मलग्राम चंद्रापूर पर्यंत जनजागृती रॕलीचे आयोजन करून "गिरवू अक्षर होऊ साक्षर","साक्षरता दिवा घरोघरी लावा" अश्या घोषणा देऊन लोकांना जागरुत केले व नंतर
स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी या रॕलीला अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी भेट देऊन पुढेही असेच समाजपयोगी उपक्रम राबण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
     यावेळी या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.प्रविण गायकर,प्रा.वाल्मिक जंजाळ,प्रा.राहुल विखे,प्रा.संदिप पठारे,प्रा.सत्यन खर्डे व तिन्ही महाविद्यालयांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने केले तर आभार प्रा.प्रविण गायकर यांनी मानले. रॕलीच्या समारोपाप्रसंगी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातूनही साक्षरतेचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले. या रॕलीच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक नेहा नाईकवडी,श्रेया धात्रक,पूजा भोसले व श्रीहर्षा चिंतम यांनी खूप कष्ट घेतले.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड