अविष्कार संशोधन स्पर्धेत प्रवरेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय ठरले उपविजेते पदाचे मानकरी
मुंबई विद्यापीठात आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संशोधक प्रकल्पाची निवड प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी निवडुंगा पासून बनवला बायोगॅस राहुरी (प्रतिनिधी): शेतीची दिवसेंदिवस होणारी बिकट परिस्थिती व जमिनीतील पाण्याची घटणारी पातळी यावर उपाय म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'निवडुंगा पासून बायोमिथेन तयार करणे' अशी भन्नाट कल्पना शोधली आहे. या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच अनुषंगाने दि.०३ व ०४ जानेवारी रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आंतरमहाविद्यालयीन अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विक्रमसिंह पासले, सायली ढेरंगे, ओमप्रकाश शेटे व सचिन वाघ यांच्या संघाने ' फोर जी बायोमिथेन प्रोडक्शन फ्राॕम कॕक्टस' या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण सहा विभागांमध्ये ११९ संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये ...