लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड
प्रतिनिधी (लोणी) : लोकसाधना चिखलगाव(लोकमान्य टिळकांचे जन्मगाव), ता.दापोली, जि.रत्नागिरी आयोजित दहा दिवसीय लोकनिर्माण युवा शिबिरासाठी लोकनेते बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.
लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास, चिखलगाव (लोकसाधना) यांच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजातील वेगळा विचार करणाऱ्या युवा पिढीला एकत्र आणून एक समृध्द, संपन्न समाजासोबतच भारताचे भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र केले जाते.पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी अर्ज मागवले जातात व दुसऱ्या टप्प्यात फोनवरून मुलाखत घेवून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ४३० अर्जांपैकी १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा अभंग तर तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह पासले, रघुनंदन चौधरी, कु.धनश्री टेके, कु.राणी माने, कु.प्रिया गवळी, कु.ऋतुजा भालेराव व कु.रुपाली धूम अशा आठ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक. २५ डिसेंबर, २०१९ ते ०३ जानेवारी, २०२० रोजी होणाऱ्या या दहा दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थांना गेल्या ३८ वर्षापासून ग्रामविकास व कौशल्य आधारित शिक्षणासाठी काम करणारे समाजसेवक डॉ.राजा व रेणू दांडेकर यांच्यासोबत १० दिवस, श्रमदान, कोकण परिचय, कोकणातील कौशल्य विकासाची चळवळ,निसर्गभान, समाजातील हिरो, स्वपरिचय, समुद्रसफर, जंगलफेरी,गटचर्चा,कलाविष्कार,शेकोटी व नववर्षाचे संकल्प आदी गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत.या सर्व विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण व आस्थापना संचालक डॉ. दिगंबर खर्डे, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर व डॉ. विजय आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteWelcome for Loksadhana NGO for Education
ReplyDeleteलोकनिर्माण युवा शिबिरासाठी मिळालेली संधी ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी असून निवड झालेल्या सर्वांचे खुप खूप अभिनंदन ...
ReplyDelete