Posts

Showing posts from September, 2018

साक्षरता शिवारफेरीला जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांची भेट

Image
जीवनाला चिकित्सक व कृतीशील बनवायचे असल्यास साक्षरता महत्त्वाची - कृषीभुषण बन्सी पाटील तांबे लोणी (राहाता): जीवनाचे वेगवेगळे पैलू जाणून घेऊन जीवनाला चिकित्सक व कृतीशील बनवायचे असल्यास साक्षरता फार महत्त्वाची आहे असे मत प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे संचालक कृषीभुषण बन्सी पाटील तांबे यांनी व्यक्त केले. जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या जनजागृती रॕलीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.               यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालय ते निर्मलग्राम चंद्रापूर पर्यंत जनजागृती रॕलीचे आयोजन करून "गिरवू अक्षर होऊ साक्षर","साक्षरता दिवा घरोघरी लावा" अश्या घोषणा देऊन लोकांना जागरुत केले व नंतर स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी या रॕलीला अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी भेट देऊन पुढेही असेच समाजपयोगी उपक्रम राबण्यासाठी शुभेच्छा दिल्या.      यावेळी या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्र

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न लोणी:- प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परिचय सर्वांना व्हावा व नवीन विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाविषयी आत्मियता निर्माण व्हावी याच अनुषंगाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुलचे कमाडंट कर्नल डॉ.भरत कुमार,तर अध्यक्ष म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक के.पी नाना आहेर पाटील, प्राचार्य ऋषिकेश औताडे आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.               या वेळी बोलताना भरतकुमार यांनी जीवनात जर यश प्राप्त करायचे असेल तर आपले क्षेत्र आपणच निवडले पाहिजे आणि या क्षेत्रात असे काम केले पाहिजे की सर्वांनी आपले नाव काढले पाहिजे असे मत व्यक्त केले.तर भारत हा शेतीप्रधान देश आहे,भारतात सुमारे ७० % लोक शेतीवर अवलंबून आहेत पण शेतीमधून पाहिजे ते

वेळेचे योग्य नियोजन करून कष्ट केल्यास यश निश्चित - सुभाष टिळेकर

Image
वेळेचे योग्य नियोजन करून कष्ट केल्यास यश निश्चित - सुभाष टिळेकर लोणी(राहता): वेळेचे योग्य नियोजन करून कष्ट केल्यास  यश निश्चित प्राप्त होते असे मत नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त राज्य जी. एस. टी. सुभाष टिळेकर यांनी व्यक्त केले. कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय लोणी यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी 'राज्यसेवा व बँकिग' या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी टिळेकर बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,वाचन संस्कृती टिकणे फार महत्त्वाचे आहे व याच वाचनामुळे आपणास सभोवतालचे चौफेर ज्ञान प्राप्त होते.                 यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस त्याचबरोबर कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषीकेश औताडे व तिन्ही महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. मधुकर खेतमाळस यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.                कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रश्नांचे निरसन टिळेकर यांच्या

Read to Learn and Learn to Read....

Image
The best example of Applied Need-Based Research.... Source - Agrowon News Paper....T This blog is purely for Educational purpose and not for commercial purpose...