लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड
प्रतिनिधी (लोणी) : लोकसाधना चिखलगाव(लोकमान्य टिळकांचे जन्मगाव), ता.दापोली, जि.रत्नागिरी आयोजित दहा दिवसीय लोकनिर्माण युवा शिबिरासाठी लोकनेते बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली. लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास, चिखलगाव (लोकसाधना) यांच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजातील वेगळा विचार करणाऱ्या युवा पिढीला एकत्र आणून एक समृध्द, संपन्न समाजासोबतच भारताचे भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र केले जाते.पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी अर्ज मागवले जातात व दुसऱ्या टप्प्यात फोनवरून मुलाखत घेवून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ४३० अर्जांपैकी १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा अभंग तर तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह पासले, रघुनंदन चौधरी,
Comments
Post a Comment