प्रवरेत वादविवाद स्पर्धा संपन्न
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा संघ ठरला प्रथम प्रवरानगर (प्रतिनिधी): प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कृषी व संलग्नित महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'ईव्हीएम मशीन की बॕलेट पेपर' असा विषय असलेल्या वादविवाद स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.प्रविण गायकर यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व व मतदान काळाची गरज का आहे या अनुषंगाने प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. रोहित उंबरकर व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्रा.सत्यन खर्डे,प्रा.राहुल विखे,प्रा.क्षिरसागर,प्रा.प्रेरणा अभंग,प्रा.अश्विनी घाडगे,प्रा.भाग्यश्री सोमवंशी, आदी मान्यवर