शेतीला पॉलीहाऊस तंत्रज्ञानाची जोड द्यावी - अविनाश थेटे


कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालया मध्ये 'ढोबळी मिरची लागवड व पेरू कलम तंत्रज्ञान"या विषयावर चर्चासत्र
 प्रवरानगर दि. ९ जानेवारी २०१९ :
शेती हा आजही सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. मात्र ,शाश्वत शेतीसाठी पॉलीहाऊस सारख्या  तंत्राची जोड शेतीला दिली पाहिजे असे मत प्रगतशील शेतकरी आणि पॉलीहाऊसचे पुरस्कर्ते अविनाश थेटे यांनी व्यक्त केले.
          प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालया मध्ये 'ढोबळी मिरची लागवड व पेरू कलम तंत्रज्ञान"या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अविनाश थेटे  बोलत होते. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या द्वितीय पूण्यस्मरणा निमित्ताने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेष्ट संचालक के.पी नाना आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या .या चर्चासत्रासाठी कृषिभूषण श्री. बंन्सी पाटील तांबे, मंडळ कृषि अधिकारी सागर गायकवाड,कृषी अधिकारी श्री  चोथे, आत्मा विभागाचे राजदत्त गोरे, कृषी संलग्नित महाविद्यालयांचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस,कृषीतंत्रनिकेतनच्या प्राचार्य सौ. थोरात, प्रा. भांड आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
         यावेळी निमगावजाळी च्या माजी सरपंच आणि पॉली हाऊस तंत्रज्ञातून प्रगत शेती करणाऱ्या सौ सुजाता थेटे यांना जिजामाता पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. निमगाव जाळी हे संगमनेर तालुक्यातील जिरायत गाव ,परंतु निर्सगावर मात  करित सौ. सुजाता थेटे आणि श्री  अविनाश थेटे या दापंत्यानी सुमारे ३५ पॉली हाऊस ची उभारणी करून कमी पाण्यात फायदेशीर उत्पादन देणारया पिकांची लागवड करताना इतर शेकर्यांनाही ते  पॉली हाऊसची उभारणी आणि पॉलिहाऊस मध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांबद्दल मार्गदर्शन करीत आहेत.
       शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री थेटे म्हणाले की पॉलीहाउस मुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येत असून, मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे, गुंतवलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळवारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. रोग किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करू न वेळेवर उपाययोजना करता येतात. या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पन्नात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फूलशेती, भाजीपाला लागवड तसेच हरितगृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदीं विषयावर त्यानी सखोल मार्गदर्शन केले.
      यावेळी बन्सी पाटील तांबे यांनी आपली यशोगाथा मांडताना सांगितले कि,शिक्षण घेतानाच ५००रुपये भांडवल आणि २ गुंठे शेतीवर गुलाबाच्या  शेतीपासून अनेक प्रयोग करून भरघोस आणि खात्रीचे उत्पादन घेतानाच गुलछडीच्या पिकाने मला कृषिभूषण पुरस्कारापर्यंत पोहोचविले असे सांगताना शेतकऱ्यांनी इतरांकडे पाहून पीक घेण्याची मानसिकता, मातीचे गुणधर्म, पाण्याची उपलब्धता, योग्य बियाणे – जैविक खते यांचा ताळमेळ, पीकविमा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या सर्व गोष्टींबाबतीत जोवर शेतकरी जागृत होत नाही तोवर शेती परवडणार नाही त्या साठी आता तरुणांनीशेती मध्ये बदल घडविण्याची अपेक्षा आहे असे सांगितले.विक्रमसिंह पासले यांनी सूत्रसंचालन तर  प्रा. सीताराम वरखड यांनी आभार  व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड