लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) उपस्थित पायरेन्सचे संचालक डॉ. बी. बी दास, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,विलास पासले,सुनिलकुमार चौधरी,सिध्दार्थ निकम आदी.(छाया दत्ता विखे) प्रवरानगर दि २२ फेब्रुवारी २०२० : साठच्या दशकातील स्वात्रंत्र्याच्या उंबरठ्यावर पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम प्रवरा परिसरातील बेचाळीस गावाच्या शेतकरी,शेतमजूर आणि समाजजीवनासाठी क्रांतिकारक ठरले. म्हणूनच, आज या परिसरातील सुमारे ७० तरुण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात काम करीत असल्याचे सांगताना. आज देशपातळीवर सेंद्रिय शेती उत्पादनाला महत्व दिले जात असल्याने शेती करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पायरेन्स संस्थेचे डायरेक्टर डॉ.बी.बी दास यांनी केले. ...
Comments
Post a Comment