प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा नांदेड येथे झालेल्या 'डीपेक्स' स्पर्धेत प्रथम क्रमांक
यांत्रिक दूध काढणी यंत्र आणि संगीताचा वनस्पतींच्या वाढीवर होणारा परिणाम या दोन प्रकल्पांचे सादरीकरण
प्रवरानगर (प्रतिनिधी):प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री गुरू गोविंदसिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथे झालेल्या 'डीपेक्स' या आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय प्रदर्शन स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवला असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान माहिती महाविद्यालयाचे संशोधन समन्वयक डॉ. निलेश सोनुने यांनी दिली.
नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे 'डीपेक्स' ही आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय प्रकल्प प्रदर्शन स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या संशोधनाचे व प्रकल्पांचे सादरीकरण केले.या स्पर्धेमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील दोन समूहांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अमोल तरकसे, विजय घोगरे ,शुभम खर्डे , तुषार खर्डे यांनी यांत्रिक दूध काढणी यंत्र तर संकेत गोदाम, संदीप चव्हाण,ऋचा खैरनार,दिपाली मालपुरे यांनी संगीताचा वनस्पतींच्या वाढीवर होणारा परिणाम या दोन प्रकल्पांचे सादरीकरण केले.
यामध्ये यांत्रिक दूध काढणी यंत्र समूहाने प्रथम क्रमांक मिळवून सर्वांची मने जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, युवा नेते डॉ.सुजय दादा विखे पाटील,विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के,प्रवरा शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,डॉ.दिगंबर खर्डे,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांना प्रा.भाऊसाहेब घोरपडे व डॉ. विशाल केदारी यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या डिझाईन इनोव्हेशन केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले व सदर यंत्रामध्ये गरजेनुसार बदल करून पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती केंद्राचे सह - समन्वयक प्रा. किशोर माळी यांनी दिली.
Comments
Post a Comment