प्रविण गभाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी
महाविद्यालयात जागतिक जलदिन ही साजरा
लोणी(प्रतिनिधी):प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रविण गभाले यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे यांनी केले.यावेळेस राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने जागतिक जलदिन ही साजरा करण्यात आला.या प्रसंगी बोलताना प्रविण गभाले यांनी आपली यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली.आपल्या एकूणच शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की फक्त हुशार असून चालत नाही तर आभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रमच आपल्याला यशापर्यंत पोहचवू शकतात व त्यासाठी जिद्दीने अभ्यास केला पाहिजे असे ते म्हणाले.
जागतिक जलदिनानिमित्त रा.से.यो.चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर यांनी पाण्याचा एकेक थेंब किती महत्त्वाचा आहे हे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.यावेळी या कार्यक्रमासाठी कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे,रा.से.यो.समन्वयक प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत,प्रा.भाऊसाहेब घोरपडे,प्रा.सारिका पुलाटे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रमसिंह पासले याने केले तर आभार प्रा.सिताराम वरखड यांनी मानले.
प्रविण गभाले यांच्या या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, युवा नेते डॉ.सुजय दादा विखे पाटील,विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के,प्रवरा शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे,तांत्रिक संचालक डॉ.व्ही.टी रेड्डी,कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,डॉ.दिगंबर खर्डे,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment