कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.पत्तीपाती झान्सी हिची उन्हाळी प्रशिक्षणासाठी मेघालय येथे निवड


प्रवरानगर (प्रतिनिधी) :
                  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यर्थिनी कु.पत्तीपाती झान्सी हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या संशोधन फेलोशिप योजने अंतर्गत मेघालयातील  नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटी शिलाँग येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
        या प्रशिक्षणासाठी कु.पत्तीपाती झान्सी या विद्यार्थिनीला प्रति महिना १० हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक अँड बायोइन्फोचे जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.रामाराव सत्यवाडा यांचे  तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.
         या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महानिदेशक डॉ. यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,,डॉ.दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ.धनंजय आहेर, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड