राणी माने हीचे गुजरात येथे झालेल्या युवा महोत्सवात सुयश


एकांकिका व नाटक या कलाप्रकारात मिळवला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक

लोणी (प्रतिनिधी) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु.राणी माने हिने नुकत्याच सरदार कृष्णनगर धांतीवाडा कृषी विद्यापीठ,धांतीवाडा बसकंथा,गुजरात येथे झालेल्या 'ॲग्रीयुनीफेस्ट -२०१९' या राष्ट्रीय युवा महोत्सवात यश संपादन केले.पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात देशभरातून जवळजवळ ७० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता.
              भारतीय कृषी संशोधन परिषद,दिल्ली यांच्या सहकार्याने देशभरातील सर्व कृषी विद्यापीठांसाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.या युवा महोत्सवात नाटक,अभिनय,एकांकिका,संगीत,इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले होते.या मध्ये राणी माने हीने एकांकिका व नाटक या कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता.आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिच्या 'दर्दपोरा' या एकांकिकेस व 'वो पांच दिन' या नाटकास अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.गुजरातचे कृषी मंत्री रांछोडभाई चनाभाई फैदू यांच्या हस्ते तिला या यशाबद्दल महोत्सवात गौरवण्यात आले.विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या कला-गुणांना या महोत्सवाच्या निमित्ताने वाव मिळतो.महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एकूण २२ जणांच्या संघामध्ये स्थान पटकावून उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर तिने विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे नाव उंचावले.तिला या महोत्सवासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मिनल शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.
              तिच्या या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, युवा नेते डॉ.सुजय दादा विखे पाटील,विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे,तांत्रिक संचालक डॉ.के.व्ही.टी रेड्डी,कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,डॉ.दिगंबर खर्डे,विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चौहान, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड