गड-किल्ले संवर्धनातून कृषी जैवतंत्रज्ञानच्या तरुणाईचा समाजासमोर नवीन आदर्श


राष्ट्रीय सेवा योजना व राजमुद्रा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

लोणी (प्रतिनिधी) : समाजातल्या समाजकंटक प्रवृत्ती व शासनाच्या पुरातत्व विभागाचे प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपणा-या वास्तूंकडे होत असणारे दुर्लक्ष व त्यामुळे दिवसेंदिवस गड-किल्ल्यांची होणारी अनावस्था लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रायगड किल्ल्यावरील परिसर स्वच्छ करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.
            ऐतिहासिक वारसा जपला तरच त्यातून प्रेरणा घेऊन एक नवीन उर्जित अवस्था असलेली व संघर्षाला जिद्दीने सामोरी जाणारी पिढी घडेल व याच हेतूने या तरुणांनी गड-किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतली होती.या मोहिमेसाठी या तरुणांना प्रा.अमोल सावंत व प्रा.प्रविण गायकर यांनी दिशादर्शक मार्गदर्शन केले.यावेळी या मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी विक्रमसिंह पासले,राजमुद्रा प्रतिष्ठानचे विजय घोगरे,अमोल तरकसे,शुभम खर्डे,
अजिंक्य पाटील,विकास आंबडकर,श्रीकांत डांगे,प्रशांत बटुळे,आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी या तरुणांनी रायगड किल्ल्यावरील सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेला कचरा,पर्यटकांनी इतरत्र फेकलेल्या वेगवेगळ्या शीतपेयांच्या व पाण्याच्या बाटल्या एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली.यामुळे रायगडाच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत झाली.
             विद्यार्थ्यांच्या या अनोख्या कामगिरीबद्दल कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषीकेश औताडे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.भविष्यकाळातही अशी समाजपयोगी कामे करत राहण्याचा विश्वासही यावेळी रासेयोच्या स्वयंसेवकांनी व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व्यक्त केला.तसेच ऐतिहासिक वारसा जपणा-या अशा वास्तूंचे आपण सर्वांनीही निगा राखून संवर्धन करण्याचे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड