Posts

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

Image
लोणी (प्रतिनिधी):महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.विद्या वर्धिनी हिने १९ वा क्रमांक मिळवला आहे.कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी सामाईक परीक्षा होते. हा प्रवेश मिळवण्यासाठी सामाईक परीक्षा चांगल्या गुणाने पास होणे आवश्यक आहे.                    या परीक्षेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी कु.विद्या वर्धीनी हिचा १९ वा क्रमांक, तर मालगे हनुमान  २२वा क्रमांक, मावळे राहुल २९ वा क्रमांक,पत्तीपाती झान्सी ४८ वा क्रमांक,आंधळे मोनिका ६१ वा क्रमांक तर म्हस्के निकिता हीने ७९ वा क्रमांक मिळवला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी  प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.                    या विद्य...

अभ्यासात सातत्य व कठोर परिश्रम महत्त्वाचे - अमोल दैने

Image
अमोल दैने यांची ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार  लोणी (प्रतिनिधी): प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल दैने यांची ऍग्री फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या हस्ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात पार पडला.यावेळी अमोल दैने सोबत महाविद्यालयातील माजी विद्यार्थी स्पेशालिस्ट ऑफिसर बँक ऑफ बडोदातील कु.कोमल बुले, ऍग्री असिस्टंट कु.श्यामला तळोले, सहायक प्राध्यापक सौ.शितल भालके आदी माजी विद्यार्थी पण उपस्थित होते.                            आपल्या एकूणच शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की बौद्धिक क्षमतेच्या जोडीला ध्येय,चिकाटी आणि जिद्द असेल तर अशक्य गोष्टीही सहज सोप्या होतात आणि फक्त हुशार असून चालत नाही तर आभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रमच आपल्याला यशापर्यंत पोहचवू शकतात जसे अर्जुनाला सगळे झाड न दिसता फक्त त्यावर बसलेला पक्ष्याचा डोळा दिसला तसेच आप...

शिक्षण हेच मानवाच्या उन्नतीचे खरे माध्यम - डॉ.मधुकर खेतमाळस

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी लोणी (प्रतिनिधी):- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ऋषीकेश औताडे,रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,डॉ.विशाल केदारी, प्रा.अमोल सावंत,श्री.सुनिल कानडे,श्री.दत्तात्रय कांबळे,सौ.निर्मळ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                             या निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधुकर खेतमाळस यांनी बोलताना शिक्षण हेच मानवाच्या उन्नतीचे खरे माध्यम आहे, शिक्षण व कठोर परिश्रम घेतले तरच विद्यार्थी आपल्या जीवनात प्रगती करू शकतात. त्यामुळे कितीही संकटे आली तरी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवावे व खूप शिकावे असे आवाहन केले तसेच महात्मा फुले य...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी चि.विक्रमसिंह पासले याची उन्हाळी प्रशिक्षणासाठी कर्नाटक येथे निवड

Image
प्रवरानगर (प्रतिनिधी) :                   प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि.विक्रमसिंह विलास पासले याची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या संशोधन फेलोशिप योजनेअंतर्गत कर्नाटकातील सेंट्रल युनिव्हर्सिटी अॉफ कर्नाटक,गुलबर्गा येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.                 या प्रशिक्षणासाठी चि.विक्रमसिंह पासले या विद्यार्थ्याला प्रति महिना १० हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.कोनकल्लु गौड यांचे त्याला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.त्याच्या या निवडीसाठी त्याला प्रा.भाऊसाहेब घोरपडे,प्रा.अमोल सावंत,प्रा.प्रविण गायकर,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.मिनल शेळके,प्रा,स्वरांजली गाढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.         ...

उष्णतेचा पारा चढत असताना कृषी जैवतंत्रज्ञानचा पक्षी आणि झाडांसाठी' एप्रिल कुल' अनोखा उपक्रम

Image
प्रवरानगर :               प्रवरा कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांना दिलासा देण्यासाठी" एप्रिल कुल" असा एक अनोखा उपक्रम राबविताना डॉ.मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,श्री अरुण,गावडे,स्वयंसेवक प्रतीक्षा अभंग,मैथिली जाधव,मृणाली जगताप,मयुरी हिंगे,आकाश अनाप,सचिन वाघ, यश मखर,विजय घोगरे,शुभम खर्डे,चोपडे संकेत,शुभम राख,आदित्य जोंधळे आदी.               तापमानाचा पारा सातत्याने वाढत असताना रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. मानवाप्रमाणेच उष्णतेचा परिणाम पश-पक्षी आणि प्राण्यांवरही होत असल्याने उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी तसेच पक्ष्यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत एप्रिल कुल असा एक अनोखा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी -विद्यार्थिनी पुढे आले असल्याची माहिती रा.सो.यो...

राणी माने हीचे गुजरात येथे झालेल्या युवा महोत्सवात सुयश

Image
एकांकिका व नाटक या कलाप्रकारात मिळवला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक लोणी (प्रतिनिधी) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु.राणी माने हिने नुकत्याच सरदार कृष्णनगर धांतीवाडा कृषी विद्यापीठ,धांतीवाडा बसकंथा,गुजरात येथे झालेल्या 'ॲग्रीयुनीफेस्ट -२०१९' या राष्ट्रीय युवा महोत्सवात यश संपादन केले.पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात देशभरातून जवळजवळ ७० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता.               भारतीय कृषी संशोधन परिषद,दिल्ली यांच्या सहकार्याने देशभरातील सर्व कृषी विद्यापीठांसाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.या युवा महोत्सवात नाटक,अभिनय,एकांकिका,संगीत,इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले होते.या मध्ये राणी माने हीने एकांकिका व नाटक या कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता.आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिच्या 'दर्दपोरा' या एकांकिकेस व 'वो पांच दिन' या नाटकास अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.गुजरातचे कृषी मंत्री रांछोडभाई चनाभाई फैदू यांच्या हस्ते तिला या यशाबद्दल महोत्सवात गौ...

गड-किल्ले संवर्धनातून कृषी जैवतंत्रज्ञानच्या तरुणाईचा समाजासमोर नवीन आदर्श

Image
राष्ट्रीय सेवा योजना व राजमुद्रा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम लोणी (प्रतिनिधी) : समाजातल्या समाजकंटक प्रवृत्ती व शासनाच्या पुरातत्व विभागाचे प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपणा-या वास्तूंकडे होत असणारे दुर्लक्ष व त्यामुळे दिवसेंदिवस गड-किल्ल्यांची होणारी अनावस्था लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रायगड किल्ल्यावरील परिसर स्वच्छ करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.             ऐतिहासिक वारसा जपला तरच त्यातून प्रेरणा घेऊन एक नवीन उर्जित अवस्था असलेली व संघर्षाला जिद्दीने सामोरी जाणारी पिढी घडेल व याच हेतूने या तरुणांनी गड-किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतली होती.या मोहिमेसाठी या तरुणांना प्रा.अमोल सावंत व प्रा.प्रविण गायकर यांनी दिशादर्शक मार्गदर्शन केले.यावेळी या मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी विक्रमसिंह पासले,राजमुद्रा प्रतिष्ठानचे विजय घोगरे,अमोल तरकसे,शुभम खर्डे, अजिंक्य पाटील,विकास आंबडकर,श्रीकांत डांगे,प्रशांत बटुळे,आदी स...