Posts

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ बाबत युवकांना प्रशिक्षण

Image
प्रवरानगर/प्रतिनिधी : पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि  कौशल्य विकास अभियान व सिमेसीस लर्निंग एलएलएलपी अंतर्गत कृषी क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या पहिल्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु झाला.             या  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह-सचिव श्री. भारत घोगरे, अध्यक्षस्थानी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, सकाळ कौशल्य झोनल म. फु. कृ. वि. राहुरी समन्वयक श्री. दिलीप क्षीरसागर, संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे व महाविद्यालय कौशल्य योजना समन्वयक प्रा. स्वप्नील नलगे आदी मान्य...

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

Image
प्रतिनिधी (लोणी) : लोकसाधना चिखलगाव(लोकमान्य टिळकांचे जन्मगाव), ता.दापोली, जि.रत्नागिरी आयोजित दहा दिवसीय लोकनिर्माण युवा शिबिरासाठी लोकनेते बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.                  लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास, चिखलगाव (लोकसाधना) यांच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजातील वेगळा विचार करणाऱ्या युवा पिढीला एकत्र आणून एक समृध्द, संपन्न समाजासोबतच भारताचे भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र केले जाते.पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी अर्ज मागवले जातात व दुसऱ्या टप्प्यात फोनवरून मुलाखत घेवून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ४३० अर्जांपैकी १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा अभंग तर तृतीय वर्षातील ...

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

Image
लोणी (प्रतिनिधी): युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात होणार आहे. गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या ३५०० प्रस्तावांपैकी ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सौरभ सुभाष केदार यांचा देखील समावेश आहे. ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या, कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील अशा विद्यार्थ्यांना 'गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' देऊन गौरवण्यात येते.               माजी कृषी अधीक्षक अधिकारी श्री. प्रकाश सांगळे, ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय न्याहारकर, द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिकचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले ...

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

Image
प्रतिनिधी (लोणी): "कृषी, पर्यावरणीय आणि उपयोजित मधील अलीकडील प्रगती वैश्विक विकासासाठी विज्ञान या विषयावर डॉ. यशवंतसिंग परमार बागकाम आणि वनीकरण विद्यापीठ, नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश,  वनस्पती रोगशास्त्र रिसर्चच्या सहकार्याने पर्यावरण विकास संस्था (एईडीएस) संस्था, कृषी संशोधन केंद्र, कैरो युनिव्हर्सिटी गिझा, इजिप्त आणि त्रिभुवन विद्यापीठ, वानिकी संस्था, पोखरा कॅम्पस, नेपाळ याच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तीन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षांचा विद्यार्थी सौरभ सुभाष केदार सहभागी झाला होता.                     परिषदेच्या उदघाटन प्रसंगी हिमाचल प्रदेश राज्यपाल श्री. बंडारू दत्तरेय यांनी येणाऱ्या तीस वर्षाची पर्यावरण आणि पाण्याची परिस्थितीची काळजी व्यक्त करत संशोधकांना यावर संशोधनाचे आवाहन केले आणि परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. यशवंत परमार  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. परविंदर कौशल ह्यांनी स्वतः विद्यार्थ्यांची सादरीकरणे पाहिली.                 ...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉकचे आयोजन

Image
शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी प्रवरानगर दि ३० सप्टेंबर २०१९ :                      लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी  नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी निर्माण करणाऱ्या इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.                    इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते. ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्न...

अवगत असलेले ज्ञान सादरीकरणासाठी सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रशिक्षण महत्वाचे - डॉ. मधुकर खेतमाळीस

Image
प्रवरानगर दि. १४ सप्टेंबर, २०१९ : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ९ ते १४ सप्टेंबर या कालावधीत सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.                        एपीजी, लर्निंग पुणे यांच्या द्वारे घेण्यात आलेल्या सहा दिवसीय प्रशिक्षण सांगता कार्यक्रमात कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेतील सर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षासाठी एप्टीट्यूड, रिझनिंग, पर्सनीलिटी डेव्हलपमेंट व सॉफ्ट स्किल सारखे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार येत असल्याची माहिती संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. धनंजय आहेर यांनी यावेळी दिली.                 ...

पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रवरा कृषी जैवतंत्रज्ञान, सिमॅसेस लर्निंग एलएलपी, पुणे व म.फु.कृ वि यांच्यामध्ये सामंजस्य करार

Image
प्रवरानगर दि. १२ सप्टेंबर, २०१९ : कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि  सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.                 केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषी क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची निवड झाली असल्याचे  प्राचार्य प...