Posts

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस

Image
प्रवरानगर दि. ४ मार्च, २०२० : आजच्या काळात भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड देत असून त्याला या समस्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी व त्यातून मातीचे ऋण फेडण्याची किमया ही कृषी पदवीधारकांमध्ये असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.            लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व कृषी महाविद्यालय यांचा सयुंक्त विद्यमाने आयोजित  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाव्हूणे म्हणून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी सौ.ललिता सबनीस, महाविद्यालयाच्या कार्यकारी व्यवस्थापन समितीचे सदस्य कृषीभूषण बन्सी पाटील तांबे, कृषीभूषण सौ. सुजाता  थेटे, विखे पाटील महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे, पालक प्रतिनिधी श्री सुभाष केदार, संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, क...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु.दिप्ती शेळके आणि चि.ओमप्रकाश शेटे या स्वयंसेवकांची 'एक भारत,श्रेष्ठ भारत' या राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड

Image
प्रवरानगर दि. २७ फेब्रुवारी, २०२०: लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु.दिप्ती भास्कर शेळके आणि ओमप्रकाश रमाकांत शेटे यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी 'एक भारत,श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबीरासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.             हे शिबीर २४ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत शेंदूरणी, ता -जामनेर येथे संपन्न होणार आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने १४ स्वयंसेवकांचा संघ पाठविण्यात आला आहे. सदर संघात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथील  स्वयंसेवक कु.दिप्ती भास्कर शेळके आणि चि.ओमप्रकाश रमाकांत शेटे यांची निवड महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या वतीने करण्यात आली. सदर निवडीसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  विद्यापीठाच्या  विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ.महावीरसिंग चव्हाण सर यांनी स्वयंसेवकां...

प्रवरेच्या विद्यार्थिनीची समर फेलोशिपसाठी मैसूर येथे निवड

Image
लोणी (प्रतिनिधी) : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी कु. भावना बापू शिंदे हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या उन्हाळी संशोधन फेलोशिप -२०२० योजनेअंतर्गत मैसूर येथील सेंट्रल फूड टेकनोलॉजिकल इन्स्टिट्यूट मैसूर, बँगलोर येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.             या प्रशिक्षणासाठी कु. भावना शिंदे या विद्यार्थिनीला प्रति महिना दहा हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ फुड सायन्स येथील वैज्ञानिक डॉ. नांनजप्पा गणेश यांचे तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.               ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील व प्रथम वर्षांपासून महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका योजनेत काम करून शिक्षण घेणारी कु. भावना शिंदेच्या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तीस प्रा. स...

पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम समाज जीवनासाठी क्रांतिकारक - डॉ. बी. बी दास

Image
लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित केलेल्या विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि व्यवस्थापन यांच्या संयुक्त मेळाव्यात (सुवर्ण चतुष्कोण) उपस्थित पायरेन्सचे संचालक डॉ. बी. बी दास, कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर,  भुसावळचे नायब तहसीलदार दिलीप बारी,महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,विलास पासले,सुनिलकुमार चौधरी,सिध्दार्थ निकम आदी.(छाया दत्ता विखे) प्रवरानगर दि २२ फेब्रुवारी २०२० :  साठच्या दशकातील स्वात्रंत्र्याच्या उंबरठ्यावर पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम प्रवरा परिसरातील बेचाळीस गावाच्या  शेतकरी,शेतमजूर आणि समाजजीवनासाठी क्रांतिकारक ठरले. म्हणूनच, आज या परिसरातील सुमारे ७० तरुण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात काम करीत असल्याचे सांगताना. आज देशपातळीवर सेंद्रिय शेती उत्पादनाला महत्व दिले जात असल्याने शेती करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पायरेन्स संस्थेचे डायरेक्टर डॉ.बी.बी दास यांनी केले.           ...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

प्रवरानगर (दत्ता विखे ): शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील ३१ विद्यार्थ्यांची शेवटच्या सहामाही सत्रातील संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक प्रा.भाऊसाहेब घोरपडे आणि सहा.समन्वयक प्रा.अमोल सावंत यांनी दिली.             यामध्ये सृजन बायोटेक निफाड, नाशिक मध्ये चामवड पंढरीनाथ, हिवारे वैभव, मांटे विशाल, अगवान मुकुंद, सोनवणे चंदन, चौधरी अभिजित, खेडेकर प्रदीप, भालेराव प्रकाश, भिडे हरीश तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर मध्ये शिंदे शुभम, भोसके सौरभ, शिंदे मेघराज,मिटकॉन बायोफर्मा सेंटर, पुणे मध्ये कु.भवारी हर्षदा, कु.भोसले पूजा, राज्य स्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र म.फु.कृ.वि राहुरी मध्ये कलांगडे महेश, खंडागळे विकास,थोरात बाबासाहेब,बरबडे शुभम,कु.आंधळे मोनिका तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये वाघमारे मयुरी,बागले अस्मिता, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे मध्ये यंद...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

प्रवरानगर (दत्ता विखे ): शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील ३१ विद्यार्थ्यांची शेवटच्या सहामाही सत्रातील संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक प्रा.भाऊसाहेब घोरपडे आणि सहा.समन्वयक प्रा.अमोल सावंत यांनी दिली.             यामध्ये सृजन बायोटेक निफाड, नाशिक मध्ये चामवड पंढरीनाथ, हिवारे वैभव, मांटे विशाल, अगवान मुकुंद, सोनवणे चंदन, चौधरी अभिजित, खेडेकर प्रदीप, भालेराव प्रकाश, भिडे हरीश तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर मध्ये शिंदे शुभम, भोसके सौरभ, शिंदे मेघराज,मिटकॉन बायोफर्मा सेंटर, पुणे मध्ये कु.भवारी हर्षदा, कु.भोसले पूजा, राज्य स्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र म.फु.कृ.वि राहुरी मध्ये कलांगडे महेश, खंडागळे विकास,थोरात बाबासाहेब,बरबडे शुभम,कु.आंधळे मोनिका तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये वाघमारे मयुरी,बागले अस्मिता, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे मध्ये यंद...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सादतपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

Image
सादतपूर मध्ये रा.सो.यो.मार्फत पी.एम किसान योजना शिबिर लोणी(प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळसाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत  मौजे सादतपूर ता-संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे कृषी महाविद्यालयाचे शिक्षण संचालक मा.डॉ.एम बी खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार संपन्न झाल्याची माहिती रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी केली... सदर शिबिराचे उदघाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि रासेयोचे कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण,सादतपुर येथील सरपंच सौ.अंजनीताई कडलग, श्री.बबनराव काळे,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा.सिताराम वरखड, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी रासेयो शिबिर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे तसेच स्वयंसेवकांनी कॉलेज -नॉलेज -व्हिलेज या प्रक्रियेतू...

अविष्कार संशोधन स्पर्धेत प्रवरेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय ठरले उपविजेते पदाचे मानकरी

Image
मुंबई विद्यापीठात आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संशोधक प्रकल्पाची निवड प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी निवडुंगा पासून बनवला बायोगॅस राहुरी (प्रतिनिधी): शेतीची दिवसेंदिवस होणारी बिकट परिस्थिती व जमिनीतील पाण्याची घटणारी पातळी यावर उपाय म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  'निवडुंगा पासून बायोमिथेन तयार करणे' अशी भन्नाट कल्पना शोधली आहे. या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.          याच अनुषंगाने दि.०३ व ०४ जानेवारी रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आंतरमहाविद्यालयीन अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विक्रमसिंह पासले, सायली ढेरंगे, ओमप्रकाश शेटे व सचिन वाघ यांच्या संघाने ' फोर जी बायोमिथेन प्रोडक्शन फ्राॕम कॕक्टस' या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण सहा विभागांमध्ये ११९ संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये ...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची अंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये निवड

Image
प्रवरानगर(प्रतिनिधी):               लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. राणी माने हिने गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव 'इंद्रधनुष्य मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.                या युवा महोत्सवात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाला वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक मिरवणूक, पटनाट्य असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.             तिला या यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चव्हाण व महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिनल शेळके आदींचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थीनीच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...

प्रवरेत अनोख्या उपक्रमातून नूतन वर्षाचे स्वागत

Image
लोणी (प्रतिनिधी):            नूतन वर्षाचे स्वागत व संकल्प घेणे असे अतूट नाते आहे. बहुतेक वेळा नवीन वर्षांमध्ये नवीन डायरी घेतली जाते आणि त्याच्या पहिल्याच पानावर संकल्प लिहिले जातात आणि गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी ते संकल्प तुटतात देखील. सरासरी संकल्प हे दैनंदिन जीवनातील घटनाक्रमात केलेला बदल असतो उदा. सकाळी पाच वाजता उठणे, सकाळी व्यायाम किंवा जीम ला जाणे, पबजी फक्त दोन तासच खेळणे इ.              त्याच अनुषंगाने प्रवरेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने अनोखी संकल्पना राबवली, त्यामध्ये संकल्प वृक्षाची प्रतिकृती तयार करून महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केलेले नववर्षाचे संकल्प चिठ्ठीवर लिहून घेऊन त्यास संकल्प वृक्षाला टांगले आहेत. महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम समन्वय सौ. मीनल शेळके यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असून, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी संकल्प वृक्ष भोवती आपल्या संकल्पाबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती, काही विद्यार्थी संकल्प लिहिण...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कमवा व शिका विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

Image
प्रवरानगर दि १९ डिसेंबर २०१९ : आर्थिक परिस्थिती खडतर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करतानाच सुरु केलेल्या "कमवा आणि शिका' योजने द्वारे शिक्षण घेता येईल अशी कल्पना नसलेले हजारो युवक-युवती "कमवा आणि शिका " योजनेतून शिक्षण घेऊन देश आणि जागतिक पातळीवर स्थावरझाले असून नुकत्याच पार पडलेल्या स्वयंसिद्धा यात्रेत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन केल्याने विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती कृषी  शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी दिली.          उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबातील होतकरू मूले-मुलींना शिक्षण मिळाले पाटहजे या साठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी  यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये " कमवा आणि शिका "ही योजना आणखी प्रभावी पणे स्वबळावर सुरू केली.संस्थेच्या...

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय अभ्यास दौरा

Image
प्रवरेच्या विद्यार्थ्यांचा बंगलोर येथे तीन दिवसीय अभ्यास दौरा संपन्न लोणी | प्रतिनिधी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित व लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय अभ्यास दौरा बँगलोर, कर्नाटक येथे आयोजित करण्यात आला होता अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.             तीन दिवसीय अशा या अभ्यास दौर्यामध्ये कृषी विद्यापीठ, बँगलोर या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी वनस्पती शरीरविज्ञान व वनस्पती जैवतंत्रज्ञान या विभागांतील विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान व शेतीसाठी त्याचा होणार उपयोग या संदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या संकल्पनेतून टाटा रॕलीस् संलग्नित 'मेटाहेलिक्स' या जगप्रसिद्ध बीज उत्पादन कंपनीस ही विद्यार्थ्यांनी भेट देऊन तेथील सर्व प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक क्षेत्र यांची माहिती घेतली. त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध विभागात काम करणाऱ्...

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ बाबत युवकांना प्रशिक्षण

Image
प्रवरानगर/प्रतिनिधी : पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि  कौशल्य विकास अभियान व सिमेसीस लर्निंग एलएलएलपी अंतर्गत कृषी क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या पहिल्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु झाला.             या  प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह-सचिव श्री. भारत घोगरे, अध्यक्षस्थानी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, सकाळ कौशल्य झोनल म. फु. कृ. वि. राहुरी समन्वयक श्री. दिलीप क्षीरसागर, संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे व महाविद्यालय कौशल्य योजना समन्वयक प्रा. स्वप्नील नलगे आदी मान्य...

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

Image
प्रतिनिधी (लोणी) : लोकसाधना चिखलगाव(लोकमान्य टिळकांचे जन्मगाव), ता.दापोली, जि.रत्नागिरी आयोजित दहा दिवसीय लोकनिर्माण युवा शिबिरासाठी लोकनेते बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.                  लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यास, चिखलगाव (लोकसाधना) यांच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजातील वेगळा विचार करणाऱ्या युवा पिढीला एकत्र आणून एक समृध्द, संपन्न समाजासोबतच भारताचे भविष्य निर्माण करण्यासाठी एकत्र केले जाते.पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी अर्ज मागवले जातात व दुसऱ्या टप्प्यात फोनवरून मुलाखत घेवून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ४३० अर्जांपैकी १५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा अभंग तर तृतीय वर्षातील ...

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

Image
लोणी (प्रतिनिधी): युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात होणार आहे. गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या ३५०० प्रस्तावांपैकी ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सौरभ सुभाष केदार यांचा देखील समावेश आहे. ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या, कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील अशा विद्यार्थ्यांना 'गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' देऊन गौरवण्यात येते.               माजी कृषी अधीक्षक अधिकारी श्री. प्रकाश सांगळे, ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय न्याहारकर, द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिकचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले ...

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

Image
प्रतिनिधी (लोणी): "कृषी, पर्यावरणीय आणि उपयोजित मधील अलीकडील प्रगती वैश्विक विकासासाठी विज्ञान या विषयावर डॉ. यशवंतसिंग परमार बागकाम आणि वनीकरण विद्यापीठ, नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश,  वनस्पती रोगशास्त्र रिसर्चच्या सहकार्याने पर्यावरण विकास संस्था (एईडीएस) संस्था, कृषी संशोधन केंद्र, कैरो युनिव्हर्सिटी गिझा, इजिप्त आणि त्रिभुवन विद्यापीठ, वानिकी संस्था, पोखरा कॅम्पस, नेपाळ याच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तीन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षांचा विद्यार्थी सौरभ सुभाष केदार सहभागी झाला होता.                     परिषदेच्या उदघाटन प्रसंगी हिमाचल प्रदेश राज्यपाल श्री. बंडारू दत्तरेय यांनी येणाऱ्या तीस वर्षाची पर्यावरण आणि पाण्याची परिस्थितीची काळजी व्यक्त करत संशोधकांना यावर संशोधनाचे आवाहन केले आणि परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. यशवंत परमार  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. परविंदर कौशल ह्यांनी स्वतः विद्यार्थ्यांची सादरीकरणे पाहिली.                 ...

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉकचे आयोजन

Image
शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी प्रवरानगर दि ३० सप्टेंबर २०१९ :                      लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी  नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी निर्माण करणाऱ्या इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.                    इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते. ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्न...

अवगत असलेले ज्ञान सादरीकरणासाठी सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रशिक्षण महत्वाचे - डॉ. मधुकर खेतमाळीस

Image
प्रवरानगर दि. १४ सप्टेंबर, २०१९ : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ९ ते १४ सप्टेंबर या कालावधीत सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.                        एपीजी, लर्निंग पुणे यांच्या द्वारे घेण्यात आलेल्या सहा दिवसीय प्रशिक्षण सांगता कार्यक्रमात कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेतील सर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षासाठी एप्टीट्यूड, रिझनिंग, पर्सनीलिटी डेव्हलपमेंट व सॉफ्ट स्किल सारखे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार येत असल्याची माहिती संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. धनंजय आहेर यांनी यावेळी दिली.                 ...

पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रवरा कृषी जैवतंत्रज्ञान, सिमॅसेस लर्निंग एलएलपी, पुणे व म.फु.कृ वि यांच्यामध्ये सामंजस्य करार

Image
प्रवरानगर दि. १२ सप्टेंबर, २०१९ : कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि  सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.                 केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषी क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची निवड झाली असल्याचे  प्राचार्य प...

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणपती

Image
प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून गणपती बाप्पा साठी कल्पवृक्ष ह्या संकल्पनेचा उपयोग करून इकोफ्रेंडली देखावा तयार केला आहे.यामध्ये नारळाचे मंच व नारळाच्या झावळ्या विणकाम करून आकर्षक रंगसंगती साधली आहे.