राणी माने हीचे गुजरात येथे झालेल्या युवा महोत्सवात सुयश
एकांकिका व नाटक या कलाप्रकारात मिळवला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक लोणी (प्रतिनिधी) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु.राणी माने हिने नुकत्याच सरदार कृष्णनगर धांतीवाडा कृषी विद्यापीठ,धांतीवाडा बसकंथा,गुजरात येथे झालेल्या 'ॲग्रीयुनीफेस्ट -२०१९' या राष्ट्रीय युवा महोत्सवात यश संपादन केले.पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात देशभरातून जवळजवळ ७० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. भारतीय कृषी संशोधन परिषद,दिल्ली यांच्या सहकार्याने देशभरातील सर्व कृषी विद्यापीठांसाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.या युवा महोत्सवात नाटक,अभिनय,एकांकिका,संगीत,इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले होते.या मध्ये राणी माने हीने एकांकिका व नाटक या कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता.आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिच्या 'दर्दपोरा' या एकांकिकेस व 'वो पांच दिन' या नाटकास अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.गुजरातचे कृषी मंत्री रांछोडभाई चनाभाई फैदू यांच्या हस्ते तिला या यशाबद्दल महोत्सवात गौ...