Posts

Showing posts from August, 2019

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने मिळवला प्रथम क्रमांक

Image
प्रवरेचा विद्यार्थी भित्तीपत्रक स्पर्धेत भारतात प्रथम लोणी:- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी विक्रमसिंह विलास पासले याने सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिजनेस, पुणे द्वारे  दि.२३ व २४ ऑगस्ट,२०१९ रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय अॕग्रीसमीट - २०१९ मध्ये 'चित्रम' विभागातील भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी दिली.         या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण ३८  भित्तीपत्रिकांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून ५ विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.यामध्ये विक्रमसिंह पासले याला प्रथम क्रमांकाचे रु.३००० पारितोषिक व प्रशस्तीपत्रक मिळाले. या वेळी प्रा.महेश चेंद्रे,डॉ.अभिजीत दसपुते,प्रा.श्रद्धा रणपिसे व प्रा.सारिका पुलाटे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर सुप्रिया काळे,कोमल कुलत,धनश