Posts

Showing posts from June, 2019

शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा - सौ.सुजाता थेटे

Image
प्रवरेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न लोणी (प्रतिनिधी): आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लांबी, रुंदी आणि खोली अशी त्रिसूत्री पूर्ण असावी  लागते तसेच आपल्या जीवनातही त्रिमिती पूर्ण केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, या निमित्त लांबी म्हणजे दीर्घायुषाची, रुंदी म्हणजे ज्ञानप्राप्तीची व खोली म्हणजे परोपकार.  प्राप्त ज्ञानाचा व अर्थार्जनाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी वापरला, तरच तुमच्या शिक्षणाचा फायदा होईल असे प्रतिपादन सौ. सुजाता थेटे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी केले.                 या वेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुजाता थेटे उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मिनल शेळके प्रा. सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊ

योग्य मार्गदर्शन, मेहनत, आणि स्मार्ट स्टडी ही यशाची गुरुकिल्ली - भाग्येश जावळे

Image
लोणी(प्रतिनिधी):लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या "माजी विद्यार्थी संवाद" या कार्यक्रमाअंतर्गत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २००८ बॅचचे माजी विद्यार्थी भाग्येश जावळे यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी बोलताना ते म्हणाले की आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा आणि  त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताना आयुष्यातील आनंदही अनुभवा, आपले मित्र,नातवाईक, छंद ही जोपासावे.           कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा अन्यथा नियोजन किंवा परिश्रम करण्यात चुकलात तर पश्चात्ताप बाकी राहतो म्हणून योग्य मार्गदर्शनाचा वापर करत स्मार्ट स्टडी करा असे आवाहनही भाग्येश जावळे यांनी विद्यार्थ्यांना केले.                          भाग्येश जावळे हे सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी  म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत

कृषी जैवतंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख प्रात्यक्षिके व अभ्यास सहलीद्वारे व्यावसायिक व्हावे - नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील

Image
लोणी (प्रतिनिधी) : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व जनसेवा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड आरोमॅंटिक प्लांटस, लखनऊ (सिमॅप) येथे आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील उपस्थित होत्या.                      सिमॅप व जनसेवा फौंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांनी चार दिवसीय अभ्यास दौऱ्यादम्यान महाविद्यालयाच्या चार भिंतीतील विचार सोडून व्यापक असा व्यावसायिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी शुभेच्छा भेटी दरम्यान केले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेच्या अंतर्गत सिमॅप ही एक संशोधन प्रयोगशाळा असून सन १९५९ पासून ती औषधी व सुगंधी वनस्पतीपासून संशोधनातून समाज उपयोगी उत्पादने निर्माण करून त्याचे औद्योगिकीकरण करून मोठया प्रमाणावर उत्पादन घेत आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी ३३ वि

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा परदेशातही नावलौकिक

Image
प्रवरेच्या विद्यार्थ्याची इस्राईल येथे इंटर्नशीपसाठी निवड लोणी (प्रतिनिधी) : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतीम वर्षातील विद्यार्थी प्रतिक चौधरी याची इस्त्राईल येथे किबुत्स स्वयंसेवक कार्यक्रमासाठी तेल अविव, इस्त्राईल येथे निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.               १९६७ साली सहा दिवसांच्या युद्धानंतर, संपूर्ण जगभरातील स्वयंसेवकांचा एक भाग इस्राईलमध्ये येण्यास सुरवात झाली. त्यांचा मुळ उद्देश  इस्राईल लोकांकडे किबुत्स स्वयंसेवक बनून त्यांना प्रोत्साहित करणे हा होता. एक समाजवादी समाजाच्या खऱ्या तत्त्वांचे पालन करणाऱ्या किबुत्स समाजाची कल्पना, सर्व कार्य, संपत्ती आणि त्यांच्या सदस्यांसह समान वाटा मिळवून देणारे कार्य स्वयंसेवकांना प्रोत्साहित करते. या विशिष्ट समुदायाचा भाग बनण्याची इच्छा परदेशींमध्ये सुद्धा आज वाढली आहे. थोड्याच कालखंडात विविध देशातील हजारो स्वयंसेवक इस्रायलमध्ये किबुत्स  स्वयंसेवक बनण्याच्या उद्देशाने

कृषी व संलग्नित शिक्षण पदवी प्रवेशासाठी प्रवरा परिसरात सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित

Image
महाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान, कृषी, उद्यानविद्या, वनविद्या,मत्स्यशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केलेले आहे.त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये कृषी पदवीच्या १४ हजार ६९७ जगाचे प्रवेश यंदा सर्वांकष अशा सामायिक प्रवेश परीक्षेतूनच (सीईटी) होणार आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठातील आठ विद्याशाखांमध्ये १७७ महाविद्यालयात प्रवेशासाठी यंदाची प्रवेश-सेतू केंद्राच्या मदतीने प्रवेश प्रक्रिया ०७ जून पासून सुरु झालेली आहे.                    प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्तळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार असून नोंदणी करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्ग विषयक माहिती द्यावी लागेल. त्याच्याशी संबधित कागदपत्रेदेखील प्रवेश सेतू केंद्राद्वारे स्कॅन करून अपलोड करावे लागतील. या  प्रवेशप्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निवडक महाविद्यालयात सेतू केंद्र सुरू झाले असून प्रवरा परिसरामध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी, प्रवरा औषधनि