Posts

Showing posts from October, 2018

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

Image
विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्व विकासावर भर देणे गरजेचे - डॉ.मगर लोणी(राहता) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने अग्निक्षेपणास्त्राचे जनक  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एस.मगर,कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.               यावेळी प्रथमतः डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्प अर्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी प्रास्ताविकातून डॉ.खेतमळस यांनी डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय थोडक्यात विद्यार्थ्यांसमोर मांडला तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यास करताना आपल्या व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर दिला पाहिजे असे मत डॉ.मगर यांनी मांडले.पुढे बोलताना ते म्हणाले की जसेजसे आपण मोठ्या पदावर जातो तसेतसे आपली प्रामाणिकता कमी होत जाते;याउलट आपण जर पदाच्या उंचीनुसार आपली प्रामाणिकता वाढवली

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुंचल्यांच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश

Image
परिसर स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी-डॉ.मधुकर खेतमाळस प्रवरानगर : प्रतिनिधी ; ०२ अॉक्टोबर,२०१८ : आपण महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे अनुकरण करायला हवे;ही प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे.सर्वांनी एकत्र येऊन प्लास्टिक चा वापर बंद केला पाहिजे.त्याचबरोबर आपला परिसर,गाव,शहर,देश स्वच्छ ठेवणे हा  प्रत्येकाचा अधिकार आहे आणि जेव्हा आपल्याला या अधिकाराची खर्या अर्थाने जाणीव होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने एक जबाबदार नागरिक बनू शकतो असे प्रतिपादन कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमळस यांनी व्यक्त केले.कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रम आयोजित केला होता यावेळेस डॉ.खेतमाळस बोलत होते.            यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात 'स्वच्छ भारत,सुंदर भारत'या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यांच्या माध्यमातून स्वच्छतेच