Posts

Showing posts from January, 2020

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सादतपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

Image
सादतपूर मध्ये रा.सो.यो.मार्फत पी.एम किसान योजना शिबिर लोणी(प्रतिनिधी): लोकनेते डॉ. बाळसाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत  मौजे सादतपूर ता-संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे कृषी महाविद्यालयाचे शिक्षण संचालक मा.डॉ.एम बी खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार संपन्न झाल्याची माहिती रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी केली... सदर शिबिराचे उदघाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि रासेयोचे कार्यक्रम समन्वयक मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण,सादतपुर येथील सरपंच सौ.अंजनीताई कडलग, श्री.बबनराव काळे,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा.सिताराम वरखड, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मा.डॉ.महावीरसिंग चव्हाण यांनी रासेयो शिबिर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे तसेच स्वयंसेवकांनी कॉलेज -नॉलेज -व्हिलेज या प्रक्रियेतून ग्रामवि

अविष्कार संशोधन स्पर्धेत प्रवरेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय ठरले उपविजेते पदाचे मानकरी

Image
मुंबई विद्यापीठात आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संशोधक प्रकल्पाची निवड प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी निवडुंगा पासून बनवला बायोगॅस राहुरी (प्रतिनिधी): शेतीची दिवसेंदिवस होणारी बिकट परिस्थिती व जमिनीतील पाण्याची घटणारी पातळी यावर उपाय म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  'निवडुंगा पासून बायोमिथेन तयार करणे' अशी भन्नाट कल्पना शोधली आहे. या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.          याच अनुषंगाने दि.०३ व ०४ जानेवारी रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे आंतरमहाविद्यालयीन अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विक्रमसिंह पासले, सायली ढेरंगे, ओमप्रकाश शेटे व सचिन वाघ यांच्या संघाने ' फोर जी बायोमिथेन प्रोडक्शन फ्राॕम कॕक्टस' या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण सहा विभागांमध्ये ११९ संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये कृषी व पशुसंव

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीची अंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये निवड

Image
प्रवरानगर(प्रतिनिधी):               लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. राणी माने हिने गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव 'इंद्रधनुष्य मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.                या युवा महोत्सवात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाला वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक मिरवणूक, पटनाट्य असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.             तिला या यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चव्हाण व महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिनल शेळके आदींचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थीनीच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचा

प्रवरेत अनोख्या उपक्रमातून नूतन वर्षाचे स्वागत

Image
लोणी (प्रतिनिधी):            नूतन वर्षाचे स्वागत व संकल्प घेणे असे अतूट नाते आहे. बहुतेक वेळा नवीन वर्षांमध्ये नवीन डायरी घेतली जाते आणि त्याच्या पहिल्याच पानावर संकल्प लिहिले जातात आणि गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी ते संकल्प तुटतात देखील. सरासरी संकल्प हे दैनंदिन जीवनातील घटनाक्रमात केलेला बदल असतो उदा. सकाळी पाच वाजता उठणे, सकाळी व्यायाम किंवा जीम ला जाणे, पबजी फक्त दोन तासच खेळणे इ.              त्याच अनुषंगाने प्रवरेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने अनोखी संकल्पना राबवली, त्यामध्ये संकल्प वृक्षाची प्रतिकृती तयार करून महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केलेले नववर्षाचे संकल्प चिठ्ठीवर लिहून घेऊन त्यास संकल्प वृक्षाला टांगले आहेत. महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम समन्वय सौ. मीनल शेळके यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असून, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी संकल्प वृक्ष भोवती आपल्या संकल्पाबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती, काही विद्यार्थी संकल्प लिहिण्यासाठी वेळ घेत होते तर आपल्या जिवलग मित्राने केलेले संकल्प वाचू