Posts

Showing posts from December, 2018

परिसर स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छताही महत्त्वाची - डॉ.आनंद चवई

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन लोणी(प्रतिनिधी) : परिसर स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे व गाडगेबाबांनी याच मार्गाचा अवलंब करत दिवसभर परिसर स्वच्छता व संध्याकाळी किर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करण्याचे काम केले असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद चवई यांनी केले.                   प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात करण्यात आले या प्रसंगी डॉ.चवई बोलत होते.संत गाडगेबाबांनी सर्वस्वाचा त्याग करून समाजप्रबोधनाचे कार्य करत असतानाच अनेक रुढी,परंपरा व अंधश्रद्धा याचे निर्मूलनही केले असेही डॉ.चवई पुढे बोलताना म्हणाले.यावेळी स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने आपल्या प्रास्ताविकातून संत गाडगेबाबांच्या कार्याचा आलेख थोडक्यात उपस्थितांसमोर मांडला.              या कार्यक्रमासाठी कृषी व संल्ग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमा

प्रवरेच्या विद्यार्थ्यांची आदर्श गावांना अभ्यास सहल

Image
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचीही घेतली भेट परिवर्तन घडवायचे असेल तर शब्दाला कृतीची जोड द्या - अण्णा हजारे प्रतिनिधी (लोणी) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची आदर्श गावांना दोन दिवासीय अभ्यास सहल आयोजित केली होती.या सहलीमध्ये स्वयंसेवकांनी आदर्शग्राम राळेगणसिद्धी व हिवरेबाजार या प्रमुख गावांना भेटी देऊन तेथील विविध विकासकामांची पाहणी केली.या अभ्यास सहली दरम्यान स्वयंसेवकांनी निघोज येथील मळगंगा देवी व भौगोलिक रांजणखळगे तसेच वडगाव दर्या येथील दर्याबाई-वेल्हाबाई देवस्थान भौगोलिक लवणस्तंभ यांची निर्मिती व नैसर्गिक रचना याचाही अभ्यास केला.               या अभ्यास सहलीमध्ये स्वयंसेवकांनी निघोज व वडगाव दर्या येथे पर्यटकांमुळे निर्माण झालेला अस्वच्छ परिसर ही साफसफाई करून स्वच्छ केला.राळेगणसिद्धी व हिवरेबाजारच्या विकासाचे प्रारूप पाहून विद्यार्थी भारावून गेले.यावेळी स्वयंसेवकांनी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली.स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने यावेळी अण्णांची मुलाखत घेऊन त्यां

कृषी व संल्गनित महाविद्यालये व सिंजेटा फौंडेशन यांच्या दरम्यान शैक्षणिक करार

Image
लोणी (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील सुशिक्षित तसेच अशिक्षित तरुणांना ग्रामीण भागातच कृषी व कृषी संलग्नित क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात तसेच शहरातील नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रशिक्षित विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय, लोणी व सिंजेटा फौंडेशन इंडिया यांच्या दरम्यान शैक्षणिक करार करण्यात आला असल्याची माहिती कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस यांनी दिली.         ग्रामीण भागातील अप्रशिक्षित मनुष्यबळाचे रुपांतर औद्योगिकदृष्ट्या लागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये करणे व त्त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन व आत्मविश्वास जागृत करण्याच्या हेतूने सिंजेटा फौंडेशन इंडिया ची स्थापना २००५ साली झाली. या कराराद्वारे सिंजेटा फौंडेशन इंडियाच्या “स्कील अपग्रेडेशन ऑफ रुरल युथ इन ऍग्रीकल्चर (सूर्या) ” प्रकल्पा अंतर्गत असलेला ४५ दिवसीय ३० विद्यार्थ्यासाठी “ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी असिस्टंट” कोर्से लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय येथे वर्षातून दोनदा राबवला जाणार आह