Posts

Showing posts from March, 2020

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस

Image
प्रवरानगर दि. ४ मार्च, २०२० : आजच्या काळात भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड देत असून त्याला या समस्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी व त्यातून मातीचे ऋण फेडण्याची किमया ही कृषी पदवीधारकांमध्ये असल्याचे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.            लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व कृषी महाविद्यालय यांचा सयुंक्त विद्यमाने आयोजित  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाव्हूणे म्हणून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी सौ.ललिता सबनीस, महाविद्यालयाच्या कार्यकारी व्यवस्थापन समितीचे सदस्य कृषीभूषण बन्सी पाटील तांबे, कृषीभूषण सौ. सुजाता  थेटे, विखे पाटील महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. अण्णासाहेब तांबे, पालक प्रतिनिधी श्री सुभाष केदार, संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प