Posts

Showing posts from September, 2019

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इंटर्नशीप टॉकचे आयोजन

Image
शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी प्रवरानगर दि ३० सप्टेंबर २०१९ :                      लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नेहमीच आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी  नवनवीन क्षेत्रात प्रशिक्षणाची ओळख करून दिली जाते त्याच दृष्टिकोनातून शिकत असतानाच अनुभव व पैसे कमावण्याची विद्यार्थ्यांना संधी निर्माण करणाऱ्या इंटर्नशाला इंटर्नशीप टॉक चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.                    इंटर्नशाला ही संस्था दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशीप करण्याची संधी उपलब्ध करून देते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते. ब-याच विद्यार्थ्यांना अंगी असलेल्या कौशल्यांचा योग्य ठिकाणी वापर करून महाविद्यालयात शिकत असतानाच अनुभव व पैसा कसा कमवता येऊ शकतो हे यावेळी विद्यार्थ्यांना इंटर्नशाला स्टुडन्ट पार्टनर रघुनंदन चौधरी, सायली  ढेरंगे, ऋचा खैरनार, ऋतुजा भालेराव यांनी अतिशय सुलभपणे समजावून सां

अवगत असलेले ज्ञान सादरीकरणासाठी सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रशिक्षण महत्वाचे - डॉ. मधुकर खेतमाळीस

Image
प्रवरानगर दि. १४ सप्टेंबर, २०१९ : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ९ ते १४ सप्टेंबर या कालावधीत सहा दिवसीय एप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.                        एपीजी, लर्निंग पुणे यांच्या द्वारे घेण्यात आलेल्या सहा दिवसीय प्रशिक्षण सांगता कार्यक्रमात कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेतील सर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षासाठी एप्टीट्यूड, रिझनिंग, पर्सनीलिटी डेव्हलपमेंट व सॉफ्ट स्किल सारखे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार येत असल्याची माहिती संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. धनंजय आहेर यांनी यावेळी दिली.                         आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोटात असलेले ज्ञान ओठात आणण्याची कला आशा प्रशिक्

पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रवरा कृषी जैवतंत्रज्ञान, सिमॅसेस लर्निंग एलएलपी, पुणे व म.फु.कृ वि यांच्यामध्ये सामंजस्य करार

Image
प्रवरानगर दि. १२ सप्टेंबर, २०१९ : कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि  सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.                 केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषी क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची निवड झाली असल्याचे  प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी सांगितले.              

लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात इकोफ्रेंडली गणपती

Image
प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून गणपती बाप्पा साठी कल्पवृक्ष ह्या संकल्पनेचा उपयोग करून इकोफ्रेंडली देखावा तयार केला आहे.यामध्ये नारळाचे मंच व नारळाच्या झावळ्या विणकाम करून आकर्षक रंगसंगती साधली आहे.