Posts

Showing posts from February, 2019

प्रवरेची विद्यार्थीनी गुजरातला रवाना

Image
गुजरात येथे होणाऱ्या युवा महोत्सवासाठी निवड लोणी:- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु.राणी माने हिची सरदार कृष्णनगर धांतीवडा कृषी विद्यापीठ,धांतीवाडा बंसकांथा,गुजरात येथे दि.०३ ते ०७ फेब्रुवारी,२०१९ रोजी होणाऱ्या युवा महोत्सवासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीच्या संघात निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे आणि प्रा.सौ.मिनल शेळके यांनी दिली.              हा महोत्सव भारतीय कृषी संशोधन परिषद,दिल्ली यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो. या महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी दडलेल्या कला,संगीत,नाटक व इतर सांस्कृतिक कला-गुणांचे प्रकटीकरण करण्याची संधी भेटते.या महोत्सवामध्ये देशातील जवळजवळ ७० कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी सहभाग नोंदवतात.              या यशस्वी विद्यार्थीनीच्या निवडीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री व विश्वस्थ अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई वि

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा निंभेरेत प्रारंभ

Image
रा.से.यो चे कॕम्प समाजाला दिशादर्शक - संपतराव सिनारे निंभेरे(राहुरी): प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरास निंभेरे येथे प्रारंभ झाला.या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव सिनारे,तर अध्यक्ष म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे सदस्य ज्ञानदेव साबळे उपस्थित होते.या श्रमसंस्कार शिबीराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.या वेळी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयांचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे,रा.से.यो.चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर,निंभेरे चे उपसरपंच गणेश सांगळे,त्याचबरोबर निंभेरे ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सेवा सोसायटी चे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.             या वेळी बोलताना संपतराव सिनारे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेचे हे कॕम्प समाजाला दिशादर्शक आहेत व याच्या माध्यमातून युवकांची शक्ती निश्चितपणे विधायक कार्यासाठी उपयोगी पडेल.कार्यक्रमाच्या

प्रवरेच्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांची औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड

Image
लोणी (राहाता) : शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,लोणी येथील २८ विद्यार्थ्यांची शेवटच्या सहामाही सत्रातील संशोधन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती शैक्षणिक समन्वयक प्रा.अमोल सावंत यांनी दिली.            यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,मांजरी (पुणे) या ठिकाणी सौरभ फुलपगार,प्रविण नरसाळे,निलेश गोडे,प्रियाल गागरे,शिवदास माळी,प्रतीक कुटे,मयूर गोडे,अमोल बोरुडे त्याचबरोबर यश बायोटेक, नाशिक या ठिकाणी महेश सूळ, कमलेश शिंदे,गौरव कदम,हनुमान माळगे,अक्षय मेमाने त्याचबरोबर नॅशनल ग्रेप्स रिसर्च सेंटर,मांजरी(पुणे) या ठिकाणी  शुभम हांडे,प्रतीक चौधरी,पूजा टोनगे,अक्षरा कवडे,सृष्टी थोरवे,सोनाली बनकर ,अमृता अढाव,ऋतुजा बहिरट याच बरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे या ठिकाणी तेजस्वीनी हिंगे,मयुरी घोडके,आभा मुसळे आदी विद्यार्थ्यांची निवड झाली असून मीटकॉन रिसर्च इन्स्टिट्युट,पुणे या ठिकाणी प्रेरणा साठे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Published News 2018

Image
News published in year 2018.                   8 I