Posts

Showing posts from December, 2019

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कमवा व शिका विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

Image
प्रवरानगर दि १९ डिसेंबर २०१९ : आर्थिक परिस्थिती खडतर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करतानाच सुरु केलेल्या "कमवा आणि शिका' योजने द्वारे शिक्षण घेता येईल अशी कल्पना नसलेले हजारो युवक-युवती "कमवा आणि शिका " योजनेतून शिक्षण घेऊन देश आणि जागतिक पातळीवर स्थावरझाले असून नुकत्याच पार पडलेल्या स्वयंसिद्धा यात्रेत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन केल्याने विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती कृषी  शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी दिली.          उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबातील होतकरू मूले-मुलींना शिक्षण मिळाले पाटहजे या साठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी  यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये " कमवा आणि शिका "ही योजना आणखी प्रभावी पणे स्वबळावर सुरू केली.संस्थेच्या कृषी

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय अभ्यास दौरा

Image
प्रवरेच्या विद्यार्थ्यांचा बंगलोर येथे तीन दिवसीय अभ्यास दौरा संपन्न लोणी | प्रतिनिधी : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित व लोकनेते बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचा तीन दिवसीय अभ्यास दौरा बँगलोर, कर्नाटक येथे आयोजित करण्यात आला होता अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.             तीन दिवसीय अशा या अभ्यास दौर्यामध्ये कृषी विद्यापीठ, बँगलोर या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी वनस्पती शरीरविज्ञान व वनस्पती जैवतंत्रज्ञान या विभागांतील विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान व शेतीसाठी त्याचा होणार उपयोग या संदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या संकल्पनेतून टाटा रॕलीस् संलग्नित 'मेटाहेलिक्स' या जगप्रसिद्ध बीज उत्पादन कंपनीस ही विद्यार्थ्यांनी भेट देऊन तेथील सर्व प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक क्षेत्र यांची माहिती घेतली. त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध विभागात काम करणाऱ्या तज्ञ मान्यवरांचे व