Posts

Showing posts from March, 2019

राणी माने हीचे गुजरात येथे झालेल्या युवा महोत्सवात सुयश

Image
एकांकिका व नाटक या कलाप्रकारात मिळवला अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक लोणी (प्रतिनिधी) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु.राणी माने हिने नुकत्याच सरदार कृष्णनगर धांतीवाडा कृषी विद्यापीठ,धांतीवाडा बसकंथा,गुजरात येथे झालेल्या 'ॲग्रीयुनीफेस्ट -२०१९' या राष्ट्रीय युवा महोत्सवात यश संपादन केले.पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात देशभरातून जवळजवळ ७० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता.               भारतीय कृषी संशोधन परिषद,दिल्ली यांच्या सहकार्याने देशभरातील सर्व कृषी विद्यापीठांसाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.या युवा महोत्सवात नाटक,अभिनय,एकांकिका,संगीत,इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले होते.या मध्ये राणी माने हीने एकांकिका व नाटक या कलाप्रकारात सहभाग नोंदवला होता.आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिच्या 'दर्दपोरा' या एकांकिकेस व 'वो पांच दिन' या नाटकास अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.गुजरातचे कृषी मंत्री रांछोडभाई चनाभाई फैदू यांच्या हस्ते तिला या यशाबद्दल महोत्सवात गौरवण्यात आल

गड-किल्ले संवर्धनातून कृषी जैवतंत्रज्ञानच्या तरुणाईचा समाजासमोर नवीन आदर्श

Image
राष्ट्रीय सेवा योजना व राजमुद्रा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम लोणी (प्रतिनिधी) : समाजातल्या समाजकंटक प्रवृत्ती व शासनाच्या पुरातत्व विभागाचे प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपणा-या वास्तूंकडे होत असणारे दुर्लक्ष व त्यामुळे दिवसेंदिवस गड-किल्ल्यांची होणारी अनावस्था लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रायगड किल्ल्यावरील परिसर स्वच्छ करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.             ऐतिहासिक वारसा जपला तरच त्यातून प्रेरणा घेऊन एक नवीन उर्जित अवस्था असलेली व संघर्षाला जिद्दीने सामोरी जाणारी पिढी घडेल व याच हेतूने या तरुणांनी गड-किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतली होती.या मोहिमेसाठी या तरुणांना प्रा.अमोल सावंत व प्रा.प्रविण गायकर यांनी दिशादर्शक मार्गदर्शन केले.यावेळी या मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी विक्रमसिंह पासले,राजमुद्रा प्रतिष्ठानचे विजय घोगरे,अमोल तरकसे,शुभम खर्डे, अजिंक्य पाटील,विकास आंबडकर,श्रीकांत डांगे,प्रशांत बटुळे,आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी या त

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.पत्तीपाती झान्सी हिची उन्हाळी प्रशिक्षणासाठी मेघालय येथे निवड

Image
प्रवरानगर (प्रतिनिधी) :                   प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यर्थिनी कु.पत्तीपाती झान्सी हिची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या संशोधन फेलोशिप योजने अंतर्गत मेघालयातील  नॉर्थ इस्टर्न हिल युनिव्हर्सिटी शिलाँग येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.         या प्रशिक्षणासाठी कु.पत्तीपाती झान्सी या विद्यार्थिनीला प्रति महिना १० हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक अँड बायोइन्फोचे जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.रामाराव सत्यवाडा यांचे  तिला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.          या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महानिदेशक डॉ. यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,,डॉ.दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ.धनंजय आहेर, कृषी संल

प्रविण गभाले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी महाविद्यालयात जागतिक जलदिन ही साजरा लोणी(प्रतिनिधी):प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रविण गभाले यांची पोलीस उपनिरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे यांनी केले.यावेळेस राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने जागतिक जलदिन ही साजरा करण्यात आला.या प्रसंगी बोलताना प्रविण गभाले यांनी आपली यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली.आपल्या एकूणच शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की फक्त हुशार असून चालत नाही तर आभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रमच आपल्याला यशापर्यंत पोहचवू शकतात व त्यासाठी जिद्दीने अभ्यास केला पाहिजे असे ते म्हणाले.                 जागतिक जलदिनानिमित्त रा.से.यो.चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर यांनी पाण्याचा एकेक थेंब किती महत्त्वाचा आहे हे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.यावेळी या कार्यक्रमासाठी कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे,रा.से.यो.सम

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा नांदेड येथे झालेल्या 'डीपेक्स' स्पर्धेत प्रथम क्रमांक

Image
यांत्रिक दूध काढणी यंत्र आणि संगीताचा वनस्पतींच्या वाढीवर होणारा परिणाम या दोन प्रकल्पांचे सादरीकरण  प्रवरानगर (प्रतिनिधी):प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री गुरू गोविंदसिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड येथे झालेल्या 'डीपेक्स' या आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय  प्रदर्शन स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवला असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान माहिती महाविद्यालयाचे संशोधन समन्वयक डॉ. निलेश सोनुने यांनी दिली.            नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे 'डीपेक्स' ही आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय प्रकल्प प्रदर्शन स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या संशोधनाचे व प्रकल्पांचे सादरीकरण केले.या स्पर्धेमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील दोन समूहांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अमोल तरकसे, विजय घोगरे ,शुभम खर्डे , तुषार खर्डे यांनी यांत्रिक दूध काढणी यंत्र तर  संकेत गोद

कृषीच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जन साधताना शेतकऱ्यांनाही फायदा करून द्यावा-डॉ अभय शेंडे

Image
प्रवरेच्या डिझाईन इनोव्हेशन सेंटरद्वारे कृषी क्षेत्रातील उद्योगांच्या संधी या विषयावर मार्गदर्शन प्रवरानगर :ज्ञानाचे रूपांतर आर्थिक संपत्ती मध्ये करण्याचे शहाणपण हे अनुभवातूनच  येत असते असे सांगताना राहता परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या डाळिंब पिकाच्या मुळावरील सूत्रकृमी आणि बुरशीवर अभ्यास करून प्रवरेत कृषीशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जन साधताना शेतकऱ्यांनाही फायदा करून द्यावा असे आवाहन पुणे येथील स्वस्ती ॲग्रो चे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.अभय शेंडे यांनी केले.        प्रवरानगर येथील कृषी आणि कृषी संलग्नित महाविदयालयामध्ये पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील डिझाईन इनोव्हेशन सेंटर द्वारे आयोजित केलेल्या कृषी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी व समर इंटर्नशीप या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्रामध्ये डॉ.अभय शेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. अविनाश जोशी,गोपाळ श्रीवास्तव,अरुण आयोडकर,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षण संच

“यंग अचिवमेंट” आणि “बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशन” पुरस्कार कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीच्या सौरभ केदारला प्रदान

Image
लोणी (राहाता): डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, खंडारी कॅम्पस,आग्रा, उत्तरप्रदेश येथे दि. २३ आणि २४ फेब्रुवारी,२०१९ रोजी  “कायमस्वरूपीची शेती आणि जैवतंत्रज्ञान यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची लवचिकता आणि पुनर्वसन व्यवस्थापन" या विषयावर पर्यावरण आणि विज्ञान अकादमी, नवी दिल्लीच्या अंतर्गत  राष्ट्रीय परिषदेमध्ये  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सौरभ सुभाष केदार, गौतम पाटेकर आणि ऋतिक गागरे हे सहभागी झाले होते.         दोन दिवासीय परिषदेमध्ये नामांकित संशोधकांनी कृषी क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी प्रगती आणि पाणी समस्येवर मार्ग काढण्याच्या वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिके दाखवली. दरम्यान  विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधने हे शेतकरी आणि समजाच्या हितासाठी करावीत असे आवाहन परिषदेचे प्रमुख डॉ.अतुल तिवारी यांनी केले.        या परिषदेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यामधून ४०० पेक्षा जास्त संशोधक/ विद्याथीं आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचा विद्यार्थी सौरभ केदार याने प्रा. प्रेरणा अभंग यांच्या मार्गदर