Posts

Showing posts from October, 2019

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

Image
लोणी (प्रतिनिधी): युवकांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषी शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन आणि मिडीया एक्झिबिटर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषीथॉन कृषी प्रदर्शनात होणार आहे. गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून प्राप्त झालेल्या ३५०० प्रस्तावांपैकी ४२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सौरभ सुभाष केदार यांचा देखील समावेश आहे. ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या, कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या उपक्रमशील अशा विद्यार्थ्यांना 'गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' देऊन गौरवण्यात येते.               माजी कृषी अधीक्षक अधिकारी श्री. प्रकाश सांगळे, ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय न्याहारकर, द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिकचे अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले या कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

Image
प्रतिनिधी (लोणी): "कृषी, पर्यावरणीय आणि उपयोजित मधील अलीकडील प्रगती वैश्विक विकासासाठी विज्ञान या विषयावर डॉ. यशवंतसिंग परमार बागकाम आणि वनीकरण विद्यापीठ, नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश,  वनस्पती रोगशास्त्र रिसर्चच्या सहकार्याने पर्यावरण विकास संस्था (एईडीएस) संस्था, कृषी संशोधन केंद्र, कैरो युनिव्हर्सिटी गिझा, इजिप्त आणि त्रिभुवन विद्यापीठ, वानिकी संस्था, पोखरा कॅम्पस, नेपाळ याच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तीन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षांचा विद्यार्थी सौरभ सुभाष केदार सहभागी झाला होता.                     परिषदेच्या उदघाटन प्रसंगी हिमाचल प्रदेश राज्यपाल श्री. बंडारू दत्तरेय यांनी येणाऱ्या तीस वर्षाची पर्यावरण आणि पाण्याची परिस्थितीची काळजी व्यक्त करत संशोधकांना यावर संशोधनाचे आवाहन केले आणि परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. यशवंत परमार  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. परविंदर कौशल ह्यांनी स्वतः विद्यार्थ्यांची सादरीकरणे पाहिली.                    या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतासह दहा देशातील आठशे पेक्षा जास्त संशोधकांनी सहभाग नोंदवला. त