Posts

Showing posts from April, 2019

अभ्यासात सातत्य व कठोर परिश्रम महत्त्वाचे - अमोल दैने

Image
अमोल दैने यांची ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार  लोणी (प्रतिनिधी): प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल दैने यांची ऍग्री फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या हस्ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात पार पडला.यावेळी अमोल दैने सोबत महाविद्यालयातील माजी विद्यार्थी स्पेशालिस्ट ऑफिसर बँक ऑफ बडोदातील कु.कोमल बुले, ऍग्री असिस्टंट कु.श्यामला तळोले, सहायक प्राध्यापक सौ.शितल भालके आदी माजी विद्यार्थी पण उपस्थित होते.                            आपल्या एकूणच शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की बौद्धिक क्षमतेच्या जोडीला ध्येय,चिकाटी आणि जिद्द असेल तर अशक्य गोष्टीही सहज सोप्या होतात आणि फक्त हुशार असून चालत नाही तर आभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रमच आपल्याला यशापर्यंत पोहचवू शकतात जसे अर्जुनाला सगळे झाड न दिसता फक्त त्यावर बसलेला पक्ष्याचा डोळा दिसला तसेच आपण क्षेत्र आधीच निवडा म्हणजे यश आपल्याला नक्की भेटेल असे प्रतिपादन अमोल दैन

शिक्षण हेच मानवाच्या उन्नतीचे खरे माध्यम - डॉ.मधुकर खेतमाळस

Image
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी लोणी (प्रतिनिधी):- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ऋषीकेश औताडे,रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर,डॉ.विशाल केदारी, प्रा.अमोल सावंत,श्री.सुनिल कानडे,श्री.दत्तात्रय कांबळे,सौ.निर्मळ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                             या निमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मधुकर खेतमाळस यांनी बोलताना शिक्षण हेच मानवाच्या उन्नतीचे खरे माध्यम आहे, शिक्षण व कठोर परिश्रम घेतले तरच विद्यार्थी आपल्या जीवनात प्रगती करू शकतात. त्यामुळे कितीही संकटे आली तरी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवावे व खूप शिकावे असे आवाहन केले तसेच महात्मा फुले यांचे विचार अंगिकारणे आजही महत्वाचे आहे हे पटवून दिले. रासयो ची स्वयंस

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी चि.विक्रमसिंह पासले याची उन्हाळी प्रशिक्षणासाठी कर्नाटक येथे निवड

Image
प्रवरानगर (प्रतिनिधी) :                   प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि.विक्रमसिंह विलास पासले याची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या संशोधन फेलोशिप योजनेअंतर्गत कर्नाटकातील सेंट्रल युनिव्हर्सिटी अॉफ कर्नाटक,गुलबर्गा येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.                 या प्रशिक्षणासाठी चि.विक्रमसिंह पासले या विद्यार्थ्याला प्रति महिना १० हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.कोनकल्लु गौड यांचे त्याला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.त्याच्या या निवडीसाठी त्याला प्रा.भाऊसाहेब घोरपडे,प्रा.अमोल सावंत,प्रा.प्रविण गायकर,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.मिनल शेळके,प्रा,स्वरांजली गाढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.                या  विद्यार्थ्याच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.सुखदेव थोरात, सहसचिव श्री.भ

उष्णतेचा पारा चढत असताना कृषी जैवतंत्रज्ञानचा पक्षी आणि झाडांसाठी' एप्रिल कुल' अनोखा उपक्रम

Image
प्रवरानगर :               प्रवरा कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांना दिलासा देण्यासाठी" एप्रिल कुल" असा एक अनोखा उपक्रम राबविताना डॉ.मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,श्री अरुण,गावडे,स्वयंसेवक प्रतीक्षा अभंग,मैथिली जाधव,मृणाली जगताप,मयुरी हिंगे,आकाश अनाप,सचिन वाघ, यश मखर,विजय घोगरे,शुभम खर्डे,चोपडे संकेत,शुभम राख,आदित्य जोंधळे आदी.               तापमानाचा पारा सातत्याने वाढत असताना रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. मानवाप्रमाणेच उष्णतेचा परिणाम पश-पक्षी आणि प्राण्यांवरही होत असल्याने उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी तसेच पक्ष्यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत एप्रिल कुल असा एक अनोखा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी -विद्यार्थिनी पुढे आले असल्याची माहिती रा.सो.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.