प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ बाबत युवकांना प्रशिक्षण

प्रवरानगर/प्रतिनिधी : पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान व सिमेसीस लर्निंग एलएलएलपी अंतर्गत कृषी क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञ या पहिल्या ४० विद्यार्थ्यांच्या वर्गाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सह-सचिव श्री. भारत घोगरे, अध्यक्षस्थानी कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, सकाळ कौशल्य झोनल म. फु. कृ. वि. राहुरी समन्वयक श्री. दिलीप क्षीरसागर, संस्थेचे कौशल्य विकास संचालक प्रा. धनंजय आहेर, प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे व महाविद्यालय कौशल्य योजना समन्वयक प्रा. स्वप्नील नलगे आदी मान्य...