कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु.दिप्ती शेळके आणि चि.ओमप्रकाश शेटे या स्वयंसेवकांची 'एक भारत,श्रेष्ठ भारत' या राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड

प्रवरानगर दि. २७ फेब्रुवारी, २०२०: लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु.दिप्ती भास्कर शेळके आणि ओमप्रकाश रमाकांत शेटे यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी 'एक भारत,श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबीरासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली. हे शिबीर २४ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत शेंदूरणी, ता -जामनेर येथे संपन्न होणार आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने १४ स्वयंसेवकांचा संघ पाठविण्यात आला आहे. सदर संघात कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथील स्वयंसेवक कु.दिप्ती भास्कर शेळके आणि चि.ओमप्रकाश रमाकांत शेटे यांची निवड महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या वतीने करण्यात आली. सदर निवडीसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ.महावीरसिंग चव्हाण सर यांनी स्वयंसेवकां...