कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न



कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

लोणी:- प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परिचय सर्वांना व्हावा व नवीन विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाविषयी आत्मियता निर्माण व्हावी याच अनुषंगाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी स्कुलचे कमाडंट कर्नल डॉ.भरत कुमार,तर अध्यक्ष म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक के.पी नाना आहेर पाटील, प्राचार्य ऋषिकेश औताडे आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
              या वेळी बोलताना भरतकुमार यांनी जीवनात जर यश प्राप्त करायचे असेल तर आपले क्षेत्र आपणच निवडले पाहिजे आणि या क्षेत्रात असे काम केले पाहिजे की सर्वांनी आपले नाव काढले पाहिजे असे मत व्यक्त केले.तर भारत हा शेतीप्रधान देश आहे,भारतात सुमारे ७० % लोक शेतीवर अवलंबून आहेत पण शेतीमधून पाहिजे तेवढा  फायदा मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी बायोटेकच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकरी बांधवांना याची कल्पना द्यावी जेणे करून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे प्रतिपादन के पी नाना यांनी आहेर यांनी केले.
                  यावेळी महाविद्यालयामद्ये पाणी वाचवा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धांकांना बक्षीस वितरणही करण्यात आले.या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक -प्रेषिता यंदे,द्वितीय क्रमांक -स्वप्नील गावडे,तृतीय क्रमांक -विक्रमसिंह पासले याने पटकावला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रमसिंह पासले याने मांडले तर सुत्रसंचालन कु.संपदा गायकवाड व मृणाल गुंजाळ यांनी केले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस