कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुंचल्यांच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश

परिसर स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी-डॉ.मधुकर खेतमाळस

प्रवरानगर : प्रतिनिधी ; ०२ अॉक्टोबर,२०१८ : आपण महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे अनुकरण करायला हवे;ही प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे.सर्वांनी एकत्र येऊन प्लास्टिक चा वापर बंद केला पाहिजे.त्याचबरोबर आपला परिसर,गाव,शहर,देश स्वच्छ ठेवणे हा  प्रत्येकाचा अधिकार आहे आणि जेव्हा आपल्याला या अधिकाराची खर्या अर्थाने जाणीव होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने एक जबाबदार नागरिक बनू शकतो असे प्रतिपादन कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमळस यांनी व्यक्त केले.कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रम आयोजित केला होता यावेळेस डॉ.खेतमाळस बोलत होते.
           यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात 'स्वच्छ भारत,सुंदर भारत'या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देणारी बोलकी चित्रे रेखाटली होती.महाविद्यालय नेहमीच अशा नवनवीन कल्पकतेतून सामाजिक संदेश देण्याचा व आपल्या कृतीतून एक आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असते.याचाच एक भाग म्हणून या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
              स्वयंसेवक प्रिया गवळी हिने भ्रष्टाचार मुक्त भारत,स्वच्छ भारत, तसेच लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान म्हणून उल्लेखनीय केलेले कार्य विदयार्थ्यांना सांगितले.केवळ विचार ऐकू नका तर विचारांचे अनुकरण करा असेही तिने आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या प्रसंगी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे,प्रा.सीताराम वरखड,रासोयो चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक ऋतुजा भालेराव हिने केले तर भावना शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्वयंसेवक निकिता म्हस्के,प्रियंका गोसावी,आदित्य जोंधळे,रघुनंदन चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रतिमा पूजन व चित्रकला स्पर्धेचा औपचारिक कार्यक्रम पार पडल्यानंतर रासेयोच्या स्वयंसेवकांनी  महाविद्यालयातील परिसर स्वच्छ केला.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस