कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी



विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्व विकासावर भर देणे गरजेचे - डॉ.मगर

लोणी(राहता) : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने अग्निक्षेपणास्त्राचे जनक  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एस.मगर,कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
              यावेळी प्रथमतः डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्प अर्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी प्रास्ताविकातून डॉ.खेतमळस यांनी डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय थोडक्यात विद्यार्थ्यांसमोर मांडला तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यास करताना आपल्या व्यक्तीमत्व विकासावर विशेष भर दिला पाहिजे असे मत डॉ.मगर यांनी मांडले.पुढे बोलताना ते म्हणाले की जसेजसे आपण मोठ्या पदावर जातो तसेतसे आपली प्रामाणिकता कमी होत जाते;याउलट आपण जर पदाच्या उंचीनुसार आपली प्रामाणिकता वाढवली तर निश्चितपणे आपण सुखाचे,आनंदाचे आयुष्य जगू शकतो व डॉ.अब्दुल कलामांनी याच गोष्टी जपल्या यामुळे आज आपण या महामानवास आदरांजली वाहतोय असेही ते म्हणाले.
           यावेळी या कार्यक्रमासाठी रासेयो चे समन्वयक प्रा.प्रविण गायकर,प्रा.महेश चंद्रे,प्रा.अमोल सावंत,प्रा.निलेश सोनुने,प्रा.स्वप्नील नलगे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विक्रमसिंह पासले याने मानले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक ऋतुजा भालेराव,प्रिया गवळी,धनश्री टेके,शिवांजली वाघमारे,अनिकेत थोपटे,सायली ढेरंगे,कोमल दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम समाज जीवनासाठी क्रांतिकारक - डॉ. बी. बी दास