कृषी व संल्गनित महाविद्यालये व सिंजेटा फौंडेशन यांच्या दरम्यान शैक्षणिक करार


लोणी (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील सुशिक्षित तसेच अशिक्षित तरुणांना ग्रामीण भागातच कृषी व कृषी संलग्नित क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात तसेच शहरातील नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी प्रशिक्षित विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय, लोणी व सिंजेटा फौंडेशन इंडिया यांच्या दरम्यान शैक्षणिक करार करण्यात आला असल्याची माहिती कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळीस यांनी दिली.
        ग्रामीण भागातील अप्रशिक्षित मनुष्यबळाचे रुपांतर औद्योगिकदृष्ट्या लागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये करणे व त्त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन व आत्मविश्वास जागृत करण्याच्या हेतूने सिंजेटा फौंडेशन इंडिया ची स्थापना २००५ साली झाली. या कराराद्वारे सिंजेटा फौंडेशन इंडियाच्या “स्कील अपग्रेडेशन ऑफ रुरल युथ इन ऍग्रीकल्चर (सूर्या) ” प्रकल्पा अंतर्गत असलेला ४५ दिवसीय ३० विद्यार्थ्यासाठी “ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी असिस्टंट” कोर्से लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय येथे वर्षातून दोनदा राबवला जाणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रूरल डेव्हलपमेंट व पंचायती राज हैदराबाद येथून प्रमाणपत्र मिळणार असून नोकरी संदर्भात  सिंजेटा फौंडेशन इंडिया प्रयत्न करणार आहे.
        कृषी व संलग्नित महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी लागणारी मुलभुत कौशल्ये तसेच स्वयंरोजगार करण्यासाठी आवश्यक असणारे मोफत निवासी ४५ दिवसीय प्रशिक्षण या कराराद्वारे १५ डिसेंबर २०१८ पासून देण्यात येणार असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती सिंजेंटा फौंडेशनचे प्रकल्प समन्वयक रविंद्र कटरे यांनी दिली.
        या करारावेळी सिजेंटा फौंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश आपटे, कार्यकारी संचालक डॉ. भास्कर रेड्डी, कोर्स समन्वयक सुजित जगताप, विजय उगले, वैभव जगताप तसेच प्रवरेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. धनंजय आहेर, कृषी महाविद्यालाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषीकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर, कृषी तंत्रनिकेतन च्या प्राचार्या सौ. अरुणा थोरात व श्री. खरात व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. विक्रम राऊत, प्रा. अमोल सावंत, प्रा. सत्यन खर्डे, प्रा. महेश चंद्रे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस