कृषी व संलग्नित महाविद्यालयांच्या वतीने लोकनेत्यास पुण्यस्मरणानामित्त अभिवादन


लोणी(प्रतिनिधी): आपल्या दूरदृष्टीने व कार्यकतृत्वाने ग्रामीण भागाचा कणा ख-या अर्थाने सक्षम करणारे लोकनेते खासदार  पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना कृषी व संलग्नित महाविद्यालयाच्या वतीने द्वितीय पुण्यस्मरणानामित्त अभिवादन करण्यात आले.
             कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. शिक्षण, राजकारण, समाजकारण व अर्थकारण संपूर्ण ग्रामीण भागात रुजवणारा नेता अशा शब्दांत राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी विक्रमसिंह पासले याने कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून लोकनेत्यास आदरांजली अर्पण केली. तर डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचांरावर चालून आपण प्रामाणिकपणे काम करणे म्हणजे खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मत प्रा. रमेश जाधव यांनी मांडले. पुढे बोलताना श्री. योगेश भोसले यांनी खासदार साहेबांनी शेतकरी व कष्टकरी प्रजेचे प्रश्न अभ्यास मंडळातून राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर  नेल्याचे नमूद केले.
           या प्रसंगी या कार्यक्रमासाठी कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमळीस, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, श्री. किशोर गुळवे आदीनी खासदार साहेबांच्या महान कार्याला उजाळा दिला. यावेळी कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस