प्रवरेच्या विद्यार्थ्यांची म.फु.कृ.वि.राहुरी संघात निवड


लोणी (प्रतिनिधी):महात्मा फुले कृषी विद्यापीठ तर्फे राहुरी येथे झालेल्या विद्यपीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थी प्रतीक्षा अभंग, मैथिली जाधव,मृणाली जगताप,
सायली ढेरंगे,शनीदेव जाधव, शुभम राख यांनी सादर केलेल्या 'युटिलायझेशन अॉफ अनकन्वेन्शनल फीड ब्लॉक' या प्रकल्पाची निवड उदयपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यपीठामध्ये होणाऱ्या विद्यपीठ स्तरावर अविष्कार स्पर्धेसाठी झाली असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली. त्यांना डॉ. विशाल केदारी यांचे मार्गदर्शन लाभले.
             यशस्वी विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री व विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोकराव कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ.राठी,कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळीस, तसेच म.फु.कृ.वि.राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंह चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

लोकनिर्माण युवा शिबिरासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

सौरभ केदार यांना राज्यस्तरीय 'कृषीथॉन गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार' जाहीर

पद्मश्री विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले सामाजिक काम समाज जीवनासाठी क्रांतिकारक - डॉ. बी. बी दास