प्रवरा कृषी संलग्नित महाविद्यालये व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांचा सामंजस्य करार



प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या व महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालये व सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यात नुकताच शैक्षणिक करार झाल्या बद्दलची माहिती कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली. या करारा द्वारे तीनही महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे सहा महिन्यांसाठी संशोधन करण्याची संधी उपलब्ध  होणार असून प्रवरा डाळिंब लागवड क्षेत्रासाठी सदर कराराद्वारे प्रशिक्षित विद्यार्थी तयार होतील असा विश्वास संस्थेचे संचालक सदस्य कृषिभूषण श्री. बन्सी पाटील तांबे यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे सदिच्छा भेटीदरम्यान व्यक्त केला. डाळिंबावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी बाजारात अनेक औषधे आहेत परंतु शेतकर्यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर मानांकित औषधांचा वापर करावा तसेच झाडाची प्रतिकार शक्ती वाढवून रोग प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देखील काळजी घ्यावी अशी माहिती केंद्राच्या संचालीका डॉ. जोत्सना शर्मा यांनी करारा दरम्यानच्या चर्चे मध्ये दिली. सदर भेटी दरम्यान केंद्रातील शास्रज्ञ डॉ. निलेश गायकवाड यांनी डाळिंब फळापासून अनारदाना, तेल, सरबत, बिस्कीट, वाईन व नैसर्गिक रंग तयार करण्या संबंधीच्या तंत्रज्ञानबाबत विस्तृत माहिती दिली. सदर करारसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रोहित उंबरकर व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा.ऋषिकेश औताडे सोलापूर येथे उपस्थित होते.

प्रथमच शासकीय संस्थेशी झालेल्या सामंजस्य करारा बद्दल राज्याचे विरोधीपक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजयदादा विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर व डॉ. विजयकुमार राठी यांनी अभिनंदन केले. 

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस