प्रवरेची विद्यार्थीनी गुजरातला रवाना


गुजरात येथे होणाऱ्या युवा महोत्सवासाठी निवड

लोणी:- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु.राणी माने हिची सरदार कृष्णनगर धांतीवडा कृषी विद्यापीठ,धांतीवाडा बंसकांथा,गुजरात येथे दि.०३ ते ०७ फेब्रुवारी,२०१९ रोजी होणाऱ्या युवा महोत्सवासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीच्या संघात निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे आणि प्रा.सौ.मिनल शेळके यांनी दिली.
             हा महोत्सव भारतीय कृषी संशोधन परिषद,दिल्ली यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो. या महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी दडलेल्या कला,संगीत,नाटक व इतर सांस्कृतिक कला-गुणांचे प्रकटीकरण करण्याची संधी भेटते.या महोत्सवामध्ये देशातील जवळजवळ ७० कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी सहभाग नोंदवतात.
             या यशस्वी विद्यार्थीनीच्या निवडीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सन्माननीय ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री व विश्वस्थ अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोकराव कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ.राठी,कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळीस,प्रा.ऋषिकेश औताडे तसेच म.फु.कृ.वि.राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंह चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस