“यंग अचिवमेंट” आणि “बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशन” पुरस्कार कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीच्या सौरभ केदारला प्रदान


लोणी (राहाता): डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, खंडारी कॅम्पस,आग्रा, उत्तरप्रदेश येथे दि. २३ आणि २४ फेब्रुवारी,२०१९ रोजी  “कायमस्वरूपीची शेती आणि जैवतंत्रज्ञान यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची लवचिकता आणि पुनर्वसन व्यवस्थापन" या विषयावर पर्यावरण आणि विज्ञान अकादमी, नवी दिल्लीच्या अंतर्गत  राष्ट्रीय परिषदेमध्ये  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सौरभ सुभाष केदार, गौतम पाटेकर आणि ऋतिक गागरे हे सहभागी झाले होते.
        दोन दिवासीय परिषदेमध्ये नामांकित संशोधकांनी कृषी क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी प्रगती आणि पाणी समस्येवर मार्ग काढण्याच्या वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिके दाखवली. दरम्यान
 विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधने हे शेतकरी आणि समजाच्या हितासाठी करावीत असे आवाहन परिषदेचे प्रमुख डॉ.अतुल तिवारी यांनी केले.
       या परिषदेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यामधून ४०० पेक्षा जास्त संशोधक/ विद्याथीं आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचा विद्यार्थी सौरभ केदार याने प्रा. प्रेरणा अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या "माती  व फळांपासून पेक्टिनेस  प्राप्त करणाऱ्या जीवाणुंची ओळख आणि उपयोग” याविषयावरील संशोधनाचे सादरीकरण केले होते आणि त्याने केलेल्या सदरीकरणांसाठी निवड समितीने त्याला द्वितीय  “बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशन“ हा पुरस्कार त्याचबरोबर त्यांनी सौरभ याच्या संशोधन आणि सामाजिक कामगिरीबद्दल “यंग अचिवमेंट” तर प्रा.प्रेरणा अभंग यांना उत्कृष्ट मार्गदर्शक  शिक्षक  या पुरस्काराने परिषदेचे प्रमुख पाहुणे ए.के.सिंग यांनी  सन्मानित केले. 
      सौरभ केदार आणि प्रा. प्रेरणा अभंग यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल विरोधी पक्ष नेते नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार सौ. शालिनीताई विखे पाटील आणि युवा नेते डॉ.सुजय दादा विखे पाटील,विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के,प्रवरा शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अशोक कोल्हे,सहसचिव भारत घोगरे, कृषी आणि कृषी संलग्नीत महाविद्यालचे संचालक श्री.मधुकर खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा,निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रोहित उंबरकर यांनी अभिनंदन केले.

Comments

  1. हे सर्व यश महाविद्यालयातील आदर्श शिक्षक आणि मार्गदर्शकामुळे मिळाले...
    आपण यापुढंही मला अशाच संधी उपलब्ध करत रहाल हिच इच्छा व्यक्त करतो...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस