उष्णतेचा पारा चढत असताना कृषी जैवतंत्रज्ञानचा पक्षी आणि झाडांसाठी' एप्रिल कुल' अनोखा उपक्रम


प्रवरानगर :
              प्रवरा कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांना दिलासा देण्यासाठी" एप्रिल कुल" असा एक अनोखा उपक्रम राबविताना डॉ.मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,श्री अरुण,गावडे,स्वयंसेवक प्रतीक्षा अभंग,मैथिली जाधव,मृणाली जगताप,मयुरी हिंगे,आकाश अनाप,सचिन वाघ, यश मखर,विजय घोगरे,शुभम खर्डे,चोपडे संकेत,शुभम राख,आदित्य जोंधळे आदी.
              तापमानाचा पारा सातत्याने वाढत असताना रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. मानवाप्रमाणेच उष्णतेचा परिणाम पश-पक्षी आणि प्राण्यांवरही होत असल्याने उष्माघाताचा फटका बसणाऱ्या प्राणी तसेच पक्ष्यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत एप्रिल कुल असा एक अनोखा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी -विद्यार्थिनी पुढे आले असल्याची माहिती रा.सो.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी दिली.
              एप्रिल महिन्यात तापमानाने चाळीशीचा पारा गाठला असून, रणरणत्या उन्हामुळे दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. ताप, खोकला, डोकेदुखी, घेरी अशा तक्रारी घेऊ डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांप्रमाणेच आता पशुवैद्यकीय दवाखान्यातही उष्माघाताने ट्रस्ट असलेल्या प्राण्यांची भर पडली आहे.अस्या पशु आणि प्राण्यांना प्राणीमित्रांकडून डॉक्टरांकडे आणले जात असून अनेक प्राण्यांमध्ये श्वसनाचा त्रासही उद्भवत आहे.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माणसाला अनेक साधने वापरता येत असली तरी पशुपक्ष्यांना,झाडांना मात्र कोणताच आधार नसतो.उन्हामुळे पाण्याची पातळी ही पण खूप कमी होत आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी आणि झाडे हे जास्त दिवस टिकवणे हे खूप आवघड झाले त्याच अनुषंगाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत एप्रिल कुल असा एक अनोखा उपक्रम करण्यात आला.
             पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी पालापाचोळ्याचे मल्चिंग करणे जेणे करून झाडे जास्त दिवस टिकेल आणि उन्हाळ्यात पक्षासाठी झाडावर पाणी ठेवून पक्ष्यांची तहान भागेल म्हणून रा.सो.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला आहे.या साठी कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल सावंत,श्री.गावडे अरुण आदी शिक्षकवृंद उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी स्वयंसेवक प्रतीक्षा अभंग,मैथिली जाधव,मृणाली जगताप,मयुरी हिंगे,आकाश अनाप,सचिन वाघ, यश मखर,विजय घोगरे,शुभम खर्डे,चोपडे संकेत,शुभम राख,आदित्य जोंधळे आणि अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस