अभ्यासात सातत्य व कठोर परिश्रम महत्त्वाचे - अमोल दैने


अमोल दैने यांची ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार 

लोणी (प्रतिनिधी): प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अमोल दैने यांची ऍग्री फिल्ड ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांच्या हस्ते कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात पार पडला.यावेळी अमोल दैने सोबत महाविद्यालयातील माजी विद्यार्थी स्पेशालिस्ट ऑफिसर बँक ऑफ बडोदातील कु.कोमल बुले, ऍग्री असिस्टंट कु.श्यामला तळोले, सहायक प्राध्यापक सौ.शितल भालके आदी माजी विद्यार्थी पण उपस्थित होते.
                           आपल्या एकूणच शैक्षणिक प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणाले की बौद्धिक क्षमतेच्या जोडीला ध्येय,चिकाटी आणि जिद्द असेल तर अशक्य गोष्टीही सहज सोप्या होतात आणि फक्त हुशार असून चालत नाही तर आभ्यासातील सातत्य व कठोर परिश्रमच आपल्याला यशापर्यंत पोहचवू शकतात जसे अर्जुनाला सगळे झाड न दिसता फक्त त्यावर बसलेला पक्ष्याचा डोळा दिसला तसेच आपण क्षेत्र आधीच निवडा म्हणजे यश आपल्याला नक्की भेटेल असे प्रतिपादन अमोल दैने यांनी केले.
                           यावेळी महाविद्यालयचे प्राचार्य प्रा.ऋषीकेश औताडे,
रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,गेस्ट लेक्टर समन्वयक प्रा.सारिका पुलाटे, प्रा.श्रद्धा रणपिसे,प्रा.स्नेहल कडू,प्रा.मनिषा  आदिक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.अशोक कोल्हे,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,डॉ.राठी,डॉ.दिगंबर खर्डे,कृषी संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे,प्रा.रोहित उंबरकर यांनी विशेष अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस