कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी चि.विक्रमसिंह पासले याची उन्हाळी प्रशिक्षणासाठी कर्नाटक येथे निवड


प्रवरानगर (प्रतिनिधी) :
                  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि.विक्रमसिंह विलास पासले याची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या संशोधन फेलोशिप योजनेअंतर्गत कर्नाटकातील सेंट्रल युनिव्हर्सिटी अॉफ कर्नाटक,गुलबर्गा येथे दोन महिन्याच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
                या प्रशिक्षणासाठी चि.विक्रमसिंह पासले या विद्यार्थ्याला प्रति महिना १० हजार रुपये संशोधन फेलोशिप मिळणार असून या प्रशिक्षणासाठी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीचे जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.कोनकल्लु गौड यांचे त्याला संशोधनासाठी मार्गदर्शन मिळणार आहे.त्याच्या या निवडीसाठी त्याला प्रा.भाऊसाहेब घोरपडे,प्रा.अमोल सावंत,प्रा.प्रविण गायकर,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.मिनल शेळके,प्रा,स्वरांजली गाढे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
               या  विद्यार्थ्याच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.सुखदेव थोरात, सहसचिव श्री.भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, कृषी व संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, तांत्रिक विभागाचे संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,अतांत्रिक विभागाचे प्रा.दिगंबर खर्डे, प्राचार्य ऋषिकेश औताडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस