कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

लोणी (प्रतिनिधी):महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.विद्या वर्धिनी हिने १९ वा क्रमांक मिळवला आहे.कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी सामाईक परीक्षा होते. हा प्रवेश मिळवण्यासाठी सामाईक परीक्षा चांगल्या गुणाने पास होणे आवश्यक आहे. या परीक्षेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी कु.विद्या वर्धीनी हिचा १९ वा क्रमांक, तर मालगे हनुमान २२वा क्रमांक, मावळे राहुल २९ वा क्रमांक,पत्तीपाती झान्सी ४८ वा क्रमांक,आंधळे मोनिका ६१ वा क्रमांक तर म्हस्के निकिता हीने ७९ वा क्रमांक मिळवला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.महेश चंद्रे यांनी दिली. या विद्य...