कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश





लोणी (प्रतिनिधी):महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.विद्या वर्धिनी हिने १९ वा क्रमांक मिळवला आहे.कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी  महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी सामाईक परीक्षा होते. हा प्रवेश मिळवण्यासाठी सामाईक परीक्षा चांगल्या गुणाने पास होणे आवश्यक आहे.
                   या परीक्षेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी कु.विद्या वर्धीनी हिचा १९ वा क्रमांक, तर मालगे हनुमान  २२वा क्रमांक, मावळे राहुल २९ वा क्रमांक,पत्तीपाती झान्सी ४८ वा क्रमांक,आंधळे मोनिका ६१ वा क्रमांक तर म्हस्के निकिता हीने ७९ वा क्रमांक मिळवला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी  प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.
                   या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के,युवा नेते डॉ.सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे,सहसचिव भारत घोगरे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ.धनंजय आहेर, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषिकेश औताडे आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

आंतरराष्ट्रीय युवा शेतकरी आणि भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणीचा विद्यार्थी सौरभ केदार द्वितीय क्रमांकने सन्मानित

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांची संशोधन प्रशिक्षणासाठी निवड

मातीचे ऋण फेडण्याची किमया कृषी पदवीधारकांमध्ये: डॉ.श्रीपाल सबनीस